पुस्तक प्रकाशन सोहळ्यात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे राजकीय मुद्दे आणि गुद्दे 

डॉ. सुधाकर पेटकर लिखित “चंदनाचे हात” पुस्तकाचे प्रकाशन

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

आत्मचरित्र हे मर्यादित नसतं, त्यातून माणूस घडतो. लिखानाचा खजिना जपून ठेवला पाहिजे. प्रसंगाला सामोरे जाता आलं पाहिजे. प्रतिभा लाभणे हे दैवी देणं असल्याचे मत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी यक्त केले. योगवर्धिनी व संगमनेर साहित्य परिषद द्वारा आयोजित डॉ. सुधाकर पेटकर लिखित “चंदनाचे हात” या पुस्तक प्रकाशन प्रसंगी डॉ. तांबे बोलत होते. ते म्हणाले की, डॉ. पेटकर यांनी परिस्थितीचे वास्तव रेखांकित केले. या योगशिक्षक, रूग्ण सेवकाने पैशाच्या मागे न लागता हाथ लागेल तिथे सुगंधीत व्हाव अस आयुष्य ते जगत आहे. त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम
राबविले. रेकार्ड ब्रेक विजीट दिल्या असतील कारण रुग्णसेवक ते योगशिक्षक आणि आता एक सजग लेखक म्हणून डॉ.पेटकर सर्वांनाच माहित आहेत असे तांबे म्हणाले. कवी गीतकार साहित्यिक बाबासाहेब सौदागर म्हणाले की, माणसाच्या भावना ह्या तरल आणि भावस्पर्शी असतात. काहींच्या ओठात तर काहींच्या बोटात जादू असते. मराठी भाषा ही समृद्ध आणि महान असल्याचे सांगत मराठी शब्द किमयाची महती सौदागर यांनी सांगितली. प्राचार्य शांताराम गजे म्हणाले माणसाच्या जीवनात स्थित्यंतर येतात तेव्हाच माणूस सिंहावलोकन करीत वाचकासमोर व्यक्त होतो. अनेक जण शून्यातून विश्व निर्माण करतात, परंतु डॉ पेटकर हे शून्य नव्हे तर ते मायनस होते, आणि या मायनस मधून त्यांनी स्वतःच्या जीवनाचा कॅनव्हास तयार केला
असल्याचे मत व्यक्त केले. आज पालक आणि मुलात दुसंवाद बनत चालल्याची खंत गजे यांनी व्यक्त केली.
तर लेखक डॉ सुधाकर पेटकर म्हणाले
संधीचा फायदा घेतल्याने
जीवन उजाळून निघाले आयुष्यातील सुवर्णक्षण ओळखा! वळण लावणारे लोक भेटली त्यामुळे उत्साह वाढला असे मत व्यक्त केले. यावेळी संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, ग्रंथालयाचे प्रमुख इद्रीस शेख, वैशाली कुलकर्णी तसेच साहित्य परिषदेचे सभासद व रसिक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक किसन हासे, सूत्रसंचालन अनिल सोमणी यांनी तर आभार ज्ञानेश्वर राक्षे यांनी मानले.

डॉ. तांबे राजकारणातून निवृत्त!

पुस्तक प्रकाशन प्रसंगी डॉ. तांबे म्हणाले की,
माणसांनी कुठेतरी थांबले पाहिजे ! “हा गेला” “तो गेला”! ‘त्याने पक्ष सोडला” अशा
प्रकारच्या टीव्हीवरील बातम्या बघून मन खिन्न होतं आहे. टीव्ही बघणेच मी बंद केल्याचे म्हणत आपण राजकारणातून निवृत्त झाल्याचे नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे असे म्हणताच सर्वत्र एकच हशा पिकला.
ते पुढे म्हणाले की, आता सत्यजित आणि हर्षल ही दोन्ही मुले सक्रिय असल्याचे सांगत ही एक प्रकारची घोषणा तर नाही ना ? याबाबत येणारा काळच ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!