स.म.भाऊसाहेब थोरात विद्यालय शेडगाव येथे वार्षिक पारितोषिक समारंभ व इयत्ता १० वी शुभेच्छा संमारभासह अनेक कार्यक्रम संपन्न…..
संगमनेर / लोकवेध live न्यूज (भाऊसाहेब फड मुख्य विशेष प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील स. म. भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय शेडगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व इयत्ता १० वी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ (निरोप समारंभ) व विविध श्रेत्रातील सेवा निवृत्त पदाधिकारी व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला
या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते
या प्रसंगी श्री बापुसाहेब सांगळे, श्री नारायण दादा नागरे, श्री घुले सर,श्री फड सर श्री नागरे सर माजी प्राध्यपक ठकाजी सांगळे सर श्री संजय नागरे सर श्री नागरे ग्रामसेवक,श्री सयाजी आमले,श्री सुरेश फड,श्री शांताराम फड,श्री रंगनाथ फड श्री राजेंद्र बडें श्री रामदास नागरे, श्री दत्तात्रय नागरे श्री किरण गिते श्री संजय सांगळे श्री माधवबाबा गोसावी रज्जाक शेख, बाबासाहेब फड,प्रदिप नागरे, दशरथ फड,
संदिप सांगळे रावसाहेब फड, राजेंद्र नागरे रामनाथ फड, कैलास आंधळे, जयराम आंधळे, मेजर साहेबराव फड, संभाजी फड सर इंदभान फड,सुकदेव सांगळे,शिवाजी नागरे, शितल उगलमुगले यांच्या सह अनेक मान्यवर व पालक महिला उपस्थित होत्या
यावेळी सर्व प्रथम प्रतिमा पुजन करण्यात आले व स्वागत गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविक करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व सेवा निवृत्त अधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला व मा श्री संजय नागरे (क्रिडारत्न पुरस्कार) व मा श्री नागरे ग्रामसेवक साहेब (आदर्श ग्रामसेवक पुरस्कार) मिळाल्याबद्दल या दोघांचा सर्व ग्रामस्थ व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला व विविध विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व समानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले
तसेच दत्तात्रय नागरे यांनी डिजिटल काटा शाळेस भेट दिला व दिलिप नागरे यांनी शाळेस साईबाबा प्रतिमा भेट दिली कै.विष्णु आप्पा नागरे यांच्या स्मरणार्थ फिरता चषक व सर्व विद्यार्थ्यांसाठी मेडल देण्यात आले व माजी प्राध्यापक ठकाजी सांगळे यांच्याकडुन विविध पुस्तके व प्रतिमा शाळेस भेट देण्यात आली कै.मिनाबाई आंधळे यांच्या स्मारणार्थ श्री मधुकर आंधळे यांच्या कडुन विदयालयास घड्याळे भेट देण्यात आली श्री शांताराम फड ५०० रुपये,श्री सुरेश फड ५०० रुपये,श्री विलास कुलकर्णी २०० रुपये शिवाजी नागरे ५०० रुपये श्री ज्ञानदेव फड सर ५०० रुपये राजेंद्र नागरे ५०० रुपये यांनी आथिंक मदत केली व इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी मुझिक सिस्टम भेट देण्यात आले व सर्वांसाठी जेवणाचे नियोजन करण्यात आले होते
सर्वांनीच इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स.प.भाऊसाहेब थोरात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सोसे सर व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व सर्वच विद्यार्थी व पालक शेडगाव येथील सर्वच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले आहे
