मा. श्री. भाऊसाहेब संतूजी थोरात विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील कानोली येथील मा. श्री. भाऊसाहेब संतूजी थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनोली या विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी वर्पे हे होते
प्रमुख पाहुणे म्हणून अमरशेठ गुंजाळ, यशवंत रिअल इस्टेट अँड बिल्डिंग सप्लायर चे मालक तसेच गजानन भोसले उपस्थित होते विद्यालयाचे प्राचार्य श्री के.एम.वर्पे सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण विद्यालयास मिष्ठान्न भोजन व शुभेच्छा समारंभाचे सर्व आयोजन केले. पाहुण्यांचा परिचय श्री. खरात सर यांनी करून दिला तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य श्री के.एम.वर्पे सर यांनी प्रमुख पाहुण्यांना शाळेची महत्वकांक्षी भूमिका सांगितली विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शक आणि मार्गदर्शनाची गरज असते याशिवाय जीवनाचा विकास करणे अवघड असते असे अनमोल विचार मांडले सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
