संगमनेरात अवैध वाळू तस्करी करणारी महिंद्रा पिकअप जप्त ; दोघांवर गुन्हा दाखल.

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर अवैध वाळू तस्करी करणारी महिंद्रा पिकअप जप्त ; दोघांवर गुन्हा दाखल. अवैध वाळू तस्करी करणारी महिंद्रा पिकअप (एम.एच.१५ ए.जी. ५२१) तालुका पोलिसांनी जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी पहाटे ४.४५ वाजता तालुक्यातील धांदरफळ शिवारातील संगमनेर-अकोले रोडवरील ध्रुव ग्लोबल स्कुल समोर कारवाई करण्यात आली. १ लाख ५० हजाराचा पिकअप व ५ हजाराची अर्धा ब्रास वाळू असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. कॉन्स्टेबल बाबासाहेब केशव शिरसाठ त्यांच्या फिर्यादीवरून फरार गाडी चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल अमित महाजन करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!