पोखरी बाळेश्वरच्या वेश्या व्यवसायावर पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाचा छापा
चार महिलांची सुटका कुंटणखाना महिला चालकासह पाच जणांना अटक साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पोखरी बाळेश्वर शिवारामध्ये अवैधरित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या कुंटणखाण्या वर घारगाव पोलिसांच्या नाकावर टिच्चूण संगमनेर उपविभागाचे पोलीसउपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने छापा टाकला.या कुंटणखाण्यात असणाऱ्या ४ महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. तर, कुंटणखाना चालविणाऱ्य महिलेसह तिचा मुलगा आणितीन ग्राहक अशा पाच जणांनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. पोलीस पथकाने यांच्याकडून ४ लाख ४०हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या पोखरी बाळेश्वर शिवारातील एका पत्र्याच्या शेडमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता .ही गुप्त माहिती खबर्यमार्फत संगमनेर उपविभागाचे पोलीसउपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना समजली .त्यांनी तात्काळ स्वतःसह आपल्या पथकातील पो ना राहुल डोके पो कॉ राहुल सारबांदे चालक अनिल कडलक संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उप निरीक्षक पल्लवी वाघ घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, उपनिरीक्षक उमेश पतंगे ,पो कॉ प्रमोद गाडेकर ,सुभाष बोडखे नामदेवबीरे यांच्या संयुक्त पथकाने मंगळ वारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बनावट ग्राहक म्हणून एका पोलिसाला पाठविले असता त्या आड्ड्यावर वैशाली उत्तम फटांगरे हिने त्या व्यक्तीला चार महिलादाखविल्या यावरून बनावट ग्राहकांची खात्री झाली. त्यानंतर त्यानेभ्रमण ध्वनीवरून पोलीस पथकास माहिती दिली. पोलीस पथकाने छापा टाकला असता एका खोलीत ४ महिला तर ३पुरुष मिळून आले.पोलीस पथकाने त्या कुंटनखान्याची सर्वतपासणी केली असता मोबाईल,रोख रक्कम आणि काही वाहने असा ४ लाख ४० हजार रुप यांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तो सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कुटन खाना चालविणारी वैशाली उत्तम फटांगरे तिचा मुलगा दिपक उत्तम फटां गरे (रा. पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर) व सागर वसंत लेंडे रा नांदुरखंदर माळ, ता. संगन नेर रामदास अशोक मोरे (रा. धुमाळवाडी रोड, ता. अकोले, शुभम बाळासाहेब मत कर रा.निमज,ता.संगमनेर) या ५जणांवर पोलिसांनी स्त्रिया व मुली अनैनिक समंध प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तर सोमनाथ यादव सरोदे (रा. आनंदवाडी, ता. संगमनेर) हा मात्र अद्याप फरार झाला आहे.
एका वर्षात दुसऱ्यांदा याच कुंटणखाण्या वर पोलिसांचा छापा
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पोखरी बाळेश्वर शिवारामध्ये अवैधरित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या कुंटणखाण्या वर तत्कालीन श्रीरामपूर उप विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी एक वर्षापूर्वी याच वैशाली फटांगरे हिच्या याच कुटनखान्यावर छापा टाकून धडक कारवाई केली होती. मात्र आता पुन्हा त्याच कुटनखान्यावर पोलीसउपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. मात्र ज्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा कुटनखाना चालत होता ते घारगावचे पोलीस नेमके कारवाई का करत नाही असा प्रश्न सर्वानाच पडला आहे
