दक्षिणेतील भाजप नेत्याच्या आता उतरेतही कुरघोड्या!पक्षांतर्गत पत्राचा संगमनेर ते नगर व्हाया कर्जत जामखेड प्रवास?

संघटन विस्कळीत करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्याचा वापर!

उतरेतील नेत्याच्या समजस भूमिकेने पक्षीय कारवाई टळली!

नगर / लोकवेध live न्यूज

 

दक्षिणेतील भाजप नेत्याच्या इशार्यावरून पक्ष संघनेच्या कार्यात अडथळा आणणार्या तालुका कार्यकारणीतील पदाधिकर्यांची प्रदेश कार्यालयाकडून कानउघडणी करण्यात आली आहे.उतरतेतील नेत्याच्या सांमजस्याच्या भूमिकेने पदाधिकार्यावरील कारवाई तूर्तास टळली आहे.

काही महीन्यापुर्वी तालुका कार्यकारणी तयार करण्यात आली.संगमनेर तालुक्यात भाजपाचे कामही चांगल्या पध्दतीने सुरू झाले होते.मात्र ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यशस्विता उतरेतील नेत्याच्या नेतृत्वाखाली होत असल्याचे देखवत नसलेल्या दक्षणितेतील एका भाजप नेत्याने आपल्या मर्जीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना फूस लावून दोन दिवसांपासून संघटनात्मक काम विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला.

एका पदाधिकार्यावरून निर्माण झालेला वाद मिटविण्यासाठी उतर नगरचे जिल्हाध्यक्ष मागील चार दिवसापासून प्रयत्न करीत होते.मात्र दक्षिणेतील भाजप नेत्याच्या मार्गदर्शनखाली काम करणार्या प्रदेश स्तरावरील एका युवा नेत्याने या संधीचा फायदा घेवून पक्षांतर्गत वाद कसा चिघळेल असाच प्रयत्न करून तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या वादात लक्ष झालेल्या तालुका अध्यक्षांनी दक्षिणेतील नेत्याच्या दबावापोटी फोन बंद करून ठेवला.जिल्हाध्यक्षानाही भेट न देता त्यांनी पक्षाने केलेल्या सूचनेची कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही.याचा परीणाम तालुका कार्यकारणी बरखास्त करण्यापर्यत झाला.

मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाद वाढू नये म्हणून प्रदेश स्तरावरील नेत्यांनी उतरेतील भाजप नेत्यांशी संपर्क साधून हा वाद मिटविण्यासाठी विनंती केली.त्यामुळे तालुका अध्यक्षांवरील कारवाई थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.मात्र सात दिवसांत खुलासा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे समजते.

संगमनेर तालुक्यात भाजपाचे उभे राहात असलेले संघटन मोडून कसे पडेल यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.यामध्ये राज्यस्तरीय नेत्यांच्या पुढे पुढे करणारे काही स्वयंघोषित नेत्यांची संख्या मोठी असून खाली संघटनेच्या कामात कोणतेही योगदान नाही पण प्रदेश स्तरावर मिरवून घेणार्यांच्या उद्योगामुळे गावपातळीवर काम करणारा सामान्य कार्यकर्ता कालच्या घटनेने चांगलाच अडचणीत आला असून दक्षिणेतील नेत्याच्या समर्थक चमूने घडवून आणलेल्या प्रकारने भाजपाचा अंतर्गत विषय विनाकारण चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान पक्ष नेतृत्वाकडून आलेले पत्र माध्यमापर्यत कोणी पोहचले याची शहनिशा आता करण्यात येत असून संगनेर ते नगर व्हाया कर्जत जामखेड असा पत्राचा प्रवास कोणी घडवून आणला याची उलट सुलट चर्चा आता पक्षात सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!