जि.प.प्राथ.शाळा माळेवाडी शाळेत स्नेहसम्मेलन उत्साहात संपन्न

 निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज/अशोक गोसावी

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे सरपंच सतीशजी ताठे व प्रवरा बँकेचे संचालक वसंतराव डुक्रे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राहुरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे साहेब यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विस्ताराधिकारी उषा सिनारे मॅडम, तसेच मा. दातीर मॅडम उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे शिक्षक बँकेचे चेअरमन रामेश्वर चोपडे सर, शिक्षक नेते बापू तांबे सर, माजी चेअरमन साहेबराव अनाप सर,विकास मंडळ विश्वस्त चांगदेव काकडे सर तसेच विविध शिक्षक संघटनांचे जिल्हाध्यक्ष तसेच संघटनांचे पदाधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू-भगिनी तसेच सोनगाव केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. त्याचप्रमाणे सात्रळ ग्रामपंचायत सदस्य व माळेवाडी- डुक्रेवाडी परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध बालगीत, देशभक्तीपर गीते,पोवाडा,लोकगीते,कोळीगीत,हिंदी गीते तसेच रिंग डान्स,पोते डान्स अशी विविध गीते सादर केली.या कार्यक्रमासाठी उपस्थितांनी भरघोस बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य,पालक शाळेचे माजी विद्यार्थी तसेच विविध पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत निवृत्ती शिंदे व सर्व सदस्य तसेच सोन्याबापू जगन्नाथ शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख पटारे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पावडे मॅडम व उपाध्यापक सुभाष जाधव सर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!