.पेटिट प्राथमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज
शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या पेटिट प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर डी एम पेटिट माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका तथा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या संगमनेर – सिन्नर विभागाच्या अधीक्षक डॉ. सौ. अस्मिता देशपांडे मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संगमनेर नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्री. आर. एन भालारे साहेब होते. आपल्या भाषणातून श्री . आर. एन्.भालारे साहेब यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम तसेच चांगल्या सवयी व पौष्टिक आहार याबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. डॉ. सौ. अस्मिता देशपांडे मॅडम यांनी गोखले एज्युकेशन सोसायटी चा इतिहास व जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता याबाबत विद्यार्थी पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून सौ. युगंधरा ताई देशमुख, संदीप घोलप व विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ. माधवी उपासनी उपस्थित होत्या. श्रीमती परिघा कुटे मॅडम यांनी अहवाल वाचन केले. श्री. माधव एरंडे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून श्रीमती सुरेखा साळवे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी थोरात मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. सुनिता गोडसे मॅडम, श्रीमती रेखा दातीर मॅडम, श्रीमती मंदा हासे मॅडम,श्री.रविंद्र चव्हाण सर, कुमारी अमृता गोडसे मॅडम व सौ.मनीषा दसरे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
