शिर्डीमधून युतीत उमेदवार देण्यावरुन गोंधळ तर आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रचारात आघाडी !
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
२०२४ लोकसभा निवडणुकीची पडघम वाजू लागले असून अदयाप युती अथवा महाविकास आघाडीने आपले उमेदवार घोषित केले नसले तरी इच्छुकांनी आपली उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून सोशल मिडीयाद्रारे प्रचाराचा शुभारंभ केल्याचे दिसून येत आहे.यात महाविकास आघाडीकडून आपली उमेदवारी समोर ठेवत ठाकरे गटाच्या शिवसेना उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे प्रचारात आघाडीवर दिसत आहे .
नेवासा , संगमनेर , अकोले , कोपरगांव , राहाता श्रीरामपूर ही तालुके शिर्डी लोकसभा मतदारसंघात येत असून या मतदार संघात विखे – थोरात – पिचड – लहामगे – काळे – कोल्हे – गडाख – मुरकुटे – आदीक यांचा बोलबाला असून राजकिय गणिते लावण्यात थोरात – विखे माहिर आहे .
संध्या राजकिय क्षितिज्यावर भाजपा – शिंदे गट , अजित पवार गट विरोध कॉग्रेस – शरद पवार गट – ठाकरे गट असून पुर्वी शिवसेना , राष्ट्रवादी पक्ष म्हटली जायची आता मात्र फुटीनंतर गट म्हणण्याची वेळ नेता , कार्यकर्ता , मतदारावर आली आहे .
२००९ पासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता राखीव तेव्हा शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणुक लढवून जिंकली होती तेव्हापासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे मात्र राजकिय प्रवाहात पुलाखालून पाणी गेल्याने राजकिय पक्षाची खिचडी झाली . सत्ताकरिता फोडा फोडी झाली . विरोध दोस्त झाले , दोस्त विरोध झाले , पक्षाची गटबाजी निर्माण झाल्याने अनेकांच्या इच्छावर पाणी फेरले गेले . केद्रींय मंत्री रामदास आठवले , बबनराव घोलप , उत्कर्षा रुपवते , भाऊसाहेब कांबळे, राजू वाघमारे यांच्यासह निचिकेत खरात , अशोक अल्हाट , यांनी सुद्धा निवडणुकी करिता चाचपाणी करत आहे .
मात्र मैत्री धर्म पाळण्याचे संकेत देत कॉग्रेस – ठाकरे – शरद पवार यांच्या कडून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर युतीकडून आठवले , लोखंडे , घोलप यापैकी कोणाला उमेदवारी द्यावी हाचं गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे . मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात पक्षाची ध्येय-धोरणे, पक्षचिन्ह याबद्दल माहिती देत व स्थानिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता गावो गावी जावून लोकांच्या गाठी – भेटी , बैठका घेत आहे विविध संघटनाना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे तर धार्मिक , सामाजिक कार्यक्रमातून जुन्या – नव्या व नवख्या कार्यकर्त्याशी हिंतगुंज करत आपलेसे करण्याचा प्रयत्न करत असल्याने उमेदवारिचा फॉर्म भरण्यापुर्वीचं वाकचौरे यांनी ५० % टक्के पेक्षा जास्त प्रचारात आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे
शिर्डी लोकसभेचे भावी उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची रात्री पिंपरणे अचानक भेट दिली असता त्यांचे स्वागत करण्यात आले पिंपरणे ग्रामपंचायत सदस्य धनंजय वाकचौरे, कोळवाडे सरपंच योगेश गुंजाळ, कल्याणराव जोर्वेकर,समीर दिघे,कांतीराम खुळे, धनंजय देशमुख, पत्रकार सुभाष भालेराव उपस्थित होते यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपले मनोगत ही व्यक्त केले
