सोशल मीडियावरील बातम्यांबाबत तुम्ही कमेंट का करता असे म्हणत शिवसेनेच्या दीपक साळुंखेंना जीवे मारण्याची धमकी
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष दीपक भानुदास साळुंखे यांना एकाने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना २६ मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील संगमनेर शहरातील गणेशनगर परिसरात घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, दीपक साळुंखे हे कामानिमित्त शहरातील गणेशनगर येथील आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. याठिकाणी नातेवाईकांच्या घरासमोर साळुंखे यांना विजय भागवत याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांबाबत तुम्ही कमेंट का करता असे विचारून तुम्ही आमच्याकडे हप्ते मागतात, असा खोटा आरोप केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत साळुंखे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विजय भागवत याच्याविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ३३५/२०२४ भादंवि कलम ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.
