संगमनेर पोलीस उपविभागात 23 जणांना प्रवेश बंदी.

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

संगमनेर पोलीस उपविभागात 23 जणांना प्रवेश बंदी. लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता व आचारसंहितेदरम्यान येणारे विविध सण, उत्सव शांततेत पार पाडावे कोणताही गैरप्रकार होऊ नये या दृष्टीने संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर शहर पोलीस स्टेशन,संगमनेर तालुका पोलीस स्टेशन व अकोले पोलीस स्टेशन मधून एकूण 46 व्यक्तींना संगमनेर ,अकोले तालुक्याच्या सीमा हद्दी मध्ये प्रवेश बंदीचे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते. सदरचे प्रस्ताव सीआरपीसी 144 खाली सादर करण्यात आले होते. त्यापैकी एकूण 23 व्यक्तींवर आज आज रोजी उपविभागीय अधिकारी संगमनेर यांनी प्रवेश बंदीचे आदेश पारित केले आहेत. आदेशांची बजावणी आज रोजी पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे. उर्वरित 23 प्रस्तावांवर देखील लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे सामाजिक शांतता भंग करण्यासंबंधाने गुन्हे ज्या व्यक्तींवर दाखल आहेत अशा व्यक्तींवर सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. सुरू असलेली निवडणूक आचारसंहिता याबरोबरच रमजान ईद,तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर सदरची कारवाई करण्यात आली आहे. दि 24/4/2024 पर्यंत सदर व्यक्तींना प्रवेश बंदी लागू करण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये या व्यक्ती संगमनेर तालुका किंवा अकोले तालुका हद्दी मध्ये मिळून आल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!