प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष, मिडिया व प्रसिद्धीप्रमुख पदी आदर्श पत्रकार मा श्री भाऊसाहेब धोंडीबा फड यांची नियुक्ती
अहमदनगर / लोकवेध live न्यूज
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष व मिडिया व प्रसिद्धी प्रमुखपदी दैनिक लोक परिवर्तन या वृत्तपत्राचे मुख्य विशेष पत्रकार प्रतिनिधी व महाशक्ती Live न्युज चैनलचे मुख्य संपादक,जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत या सामाजिक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री भाऊसाहेब धोंडीबा फड( संगमनेर) यांची मा श्री आबासाहेब शिरसाठ साहेब असं.नगर जिल्हा अध्यक्ष व मा श्री रविंद्र लिंबोरे साहेब अ.नगर जिल्हा उपाध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.
मा श्री भाऊसाहेब धोंडीबा फड हे पत्रकारिता, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय विविध संघटना, संस्थानी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मा श्री भाऊसाहेब धोंडीबा फड हे मु पो ओझर बु ता संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असुन त्यांनी जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत या सामाजिक संघटनेची स्थापना करून सामाजिक कार्य करत आहे व या सामाजिक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत व महा शक्ती Live न्युज चैनल चे मुख्य संपादक आहेत
तसेच या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे साहेब व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष व दैनिक लोक परिवर्तन चे मुख्य संपादक श्री आबासाहेब शिरसाठ साहेब व अहमदनगर जिल्ह्य उपाध्यक्ष व जिल्हा प्रत्रकार प्रतिनिधी श्री रविंद्र लिंबोरे साहेब व प्रत्रकार श्री अशोकराव सांगळे साहेब व श्री माधव आघाव व मंत्रालय, विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक हप्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष डॉ. नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, कार्याध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कोकण उपाध्यक्ष महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
व मा श्री भाऊसाहेब धोंडीबा फड यांची अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष व मिडिया व प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र सर्व प्रेस संपादक व प्रत्रकार प्रतिनिधी यांच्या वतीने अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे
