रयतचा मुख्याध्यापक हा प्रत्येक शाखेचा आधारस्तंभ असतो… उपाध्यक्ष अरुण कडू पाटील

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी 

रयत शिक्षण संस्थेचे आश्वि इंग्लिश स्कूल,आश्वि विद्यालयांमध्ये आज प्राचार्य बर्डे जे.आर यांचा सेवापुर्ती समारंभ तसेच शिपाई कोल्हे मामा यांचा सेवापूर्ती समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य बाळकृष्ण ठकाजी होडगर पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष,रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पुंजाजी कडू पाटील उपस्थित होते. मार्गदर्शन करताना अरुण कडू पाटील यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीस जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रमा शिवाय पर्याय नाही.आणि शाखेला चांगली उभारी देण्यासाठी संस्थेने मुख्याध्यापकाना संपूर्ण अधिकार दिलेले असतात त्याचा त्यांनी योग्य वेळी योग्य वापर केल्यास शाखा नावारूपासआल्याशिवाय राहत नाही. प्राचार्य बर्डे यांनीही आपला सेवाकाळात संस्थेच्या ध्येय धोरणाचा पाठपुरावा करत शाखेला योग्य असे स्थान प्राप्त करून दिले आहे.याप्रसंगी
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या हस्ते प्राचार्य बर्डे जे.आर यांना सन्मान चिन्ह,मानपत्र प्रदान करण्यात आले यावेळी संस्थेचे माजी विभागीय अधिकारी शिरसाठ साहेब तसेच सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे साहेब, स्कूल कमिटीचे सदस्य सुभाषराव म्हसे पाटील सुमातीलाल गांधी पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम व अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यालयाच्या वतीने प्राचार्य बर्डे सर व कोल्हे मामा यांना शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.आपल्या मनोगतामध्ये बोलताना रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे साहेब यांनी सांगितले की सेवानिवृत्तीनंतर प्रत्येक रयत सेवकाने समाजशील बनले पाहिजे समाजामध्ये जाऊन चांगले काम केले पाहिजे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाणे बी.एम यांनी केले अध्यक्ष निवड विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक शहाणे आर.एन.यांनी केली.तसेच अनुमोदन श्रीम वाकचौरे एस के.यांनी दिले. मानपत्राचे वाचन विद्यालयातील शिक्षिका संसारे एस एफ यांनी केले यावेळीअनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले बर्डे सर यांची कन्या कु.सोनाली बर्डे हिने आपले मनोगत व्यक्त करत आपल्या वडिलांच्या कार्याचा परिचय करून दिला. यावेळी उपस्थित अनेकांनी बर्डे जे. आर . व कोल्हे मामा यांचा सत्कार केला विद्यालयातील सिनारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .गाडे यांनी सूत्रसंचालन केले तर धराडे सी.आर यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता अश्वि इंग्लिश स्कूल कमिटी ग्रामस्थ शालेय व्यवस्थापन समिती शालेय विकास समिती सर्व माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!