स्वराज सातपुते याची जवाहर नवोदय साठी निवड
निमगाव जाळी/ लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
वृद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तिसगाव विद्यालयातील इयत्ता पाचवीत शिकत असलेला विद्यार्थी स्वराज देविदास सातपुते याची केंद्र सरकारच्या वतीने चालवले जात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे इयत्ता सहावी साठी निवड झाली आहे.
स्वराज च्या या यशाबद्दल जिल्हा मराठा विद्या प्रसारकचे अध्यक्ष रामचंद्र दरे,उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर, ऍड. विश्वासराव आठरे,जयंत वाघ, ऍड.दीपलक्ष्मी म्हसे, डॉ.बाळकृष्ण मरकड,चंद्रकांत म्हस्के,अरविंद आठरे, काशिनाथ लवांडे, प्राचार्य मच्छिंद्र गोसावी,केशव जाधव,दादासाहेब मरकड तसेच नातेवाईक,मित्र परिवार, व सातपुते परिवार या सर्वांनी अभिनंदन केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्वराजला शिक्षक विनायक शिंदे, सुवर्णा अकोलकर,प्रेरणा कदम, आई शिक्षिका सौ.मनीषा सातपुते व वडील रयत सेवक देविदास सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले. स्वराज सातपुते याचे या निवडीबद्दल विद्यालय व शैक्षणिक क्षेत्रात अभिनंदन होत आहे.
