अंतरिक तळमळ ही नवचेतना आहे ; ही चेतनाच परिवर्तन करेल” ; उत्कर्षा रूपवते
हजारो दानशूरांचे मतदानरूपी हात पुढे यावेत:- गोरक्षनाथ कहाणे
संगमनेर / लोकवेध live न्यूज /भारत रेघाटे
“पैसे घेतल्याशिवाय मतदान करण्यासाठी घराबाहेर पडणार नाही” असे अनेक किस्से वार्डा- वार्डातून, मतदार संघात घडलेले आपण ऐकले असतील, तर दुसरीकडे आपला माणूस निवडून यावा, पुढे जावा ही अंतरिक तळमळ, आणि मनातून निघालेली नवचेतनेची भावना आपणास पाहावयास मिळाली, ती अकोले तालुक्यातील चास पिंपळदरी या छोट्याशा खेडेगावातून. स्वयंप्रेरणेने मदतीसाठी पुढे येणारे हात कमीच असतात. पिठाच्या गिरणीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असलेल्या गोरक्षनाथ सावळेराम कहाणे यांची ही कहाणी. आपण स्वतः आधू आहोत याची जाणीवही या व्यक्तीला वाटली नाही. उलट एक वेगळी उर्मी त्यांच्यात दिसून आली. आपण राजीखुशीने ही मदत खूश होत करीत आहोत.
आपला माणूस खासदारकीसाठी उभा आहे. आपल्या तालुक्याचा, आपल्या गावाचा ,आपल्या परिसराचा कायापलट हा केंद्रातून व्हावा असे प्रत्येकाला वाटते.
सर्वसामान्य माणूस हा लोकशाहीचा खरा केंद्रबिंदू वाटावा. येथील वास्तव केंद्र सरकारला दिसावे हेच अपेक्षित. अकोले तालुक्यातील पिंपळदरी चास मधील
गोरक्षनाथ सावळेराम कहाणे नामक डाव्या हाताने आधू झालेल्या बांधवाने उत्कर्षा रूपवते यांना पाच हजाराची म्हणजेच ही लाख मोलाची, फार मोलाची मदत केल्याचे समोर आले. माणसे शरीराने आधू असतील, पण मनाने आधू होता कामा नये! या सत्पात्री दानातून उमेदवार पात्र ठरणार असल्याचे कहाणे
या दानशूराने आपली भावना व्यक्त केली.
गोरक्षनाथ कहाणे यांची कहाणी वेगळीच आहे.
तीन वर्षांपूर्वी याच पिठाच्या गिरणीमध्ये त्यांचा डाव्या हात गेल्याने ते आधू झाले .
या सर्व सामान्य माणसाने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणतात उत्कर्षा रूपवते ही तालुक्याची लेक आहे याची जाणीव आहे. पैसा आज आहे, उद्या नाही. परंतु उत्कर्षा रूपवतेच्या विजयातून मतदार संघाचा विकास होऊन तो चिरंतन राहील असे त्यांनी सांगितले. कालच प्रत्यक्ष भेट घेत ही रक्कमही सुपूर्द केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. इतिहासाची पुनरावृत्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक चळवळीची विचाराधारा या देशाचे रक्षण करेल. लोकशाहीत लोकांचे राज्य असते. येथील लोकच लोकशाहीचे रक्षण करतील असे उत्कर्षा रूपवते यांनी कहाणे यांचे आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या. “मन कि खुशी दिल का राज” शिर्डी लोकसभेवर उत्कर्षा रूपवते करेल राज” अशा भावना सर्वत्र व्यक्त होतांना दिसून येत आहेत. आजुबाजुला बघितले तर अनेकाकडे संपत्ती असूनही दानत नाही. परंतु अनमोल अशा मतदानातून हे परिवर्तन आपण करू शकतो. म्हणूणच मतदानरूपी मदतीचे परिणाम आपल्या तालुक्यासाठी, आपल्या परिसरासाठी, आपल्या गावासाठी निश्चितच सकारात्मक राहणार आहेत. येथूनच आपला खरा विकास होणार आहे. सुरूवात आपल्या पासून झाली पाहिजे! परंतु सुरूवात करणाराही हवा. हे ही तितकेच खरे! अशा या समाज विधायक कामातून आणि प्रत्यक्ष कृतीतून प्रस्तापितांना चांगलीच चपराक बसणार असून कदाचित त्यामुळे ते यू टर्न घेतील. कारण मागील अनेक निवडणुकीमध्ये येथील जनतेची या उमेदवारांनी
दिशाभूल केली आहे. जनता आता त्यांच्या या अमिषाला बळी न पडता येथील वातावरण ढवळून काढण्यासाठी देणारे मदतीचे अनेक हात पुढे येतील असा विश्वास उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला असून हीच तर खरी विजयाची गुढी आहे. कारण तळा- गाळातील सर्वसामान्य माणसाची ताकद सोबत असणे हाच खरा विजय होय. मतदार हा खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीचा कणा आहे. तो राजा आहे. आणि तो राजा असण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोरक्षनाथ कहाने. या मतदार राजाने वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रगतीसाठी सर्वसामान्यांचे प्रश्न हाताशी घेऊन पुढे जाताना दिसत आहे. त्यातूनच गोरक्षनाथ
कहाणे सारखे मतदार राजा मोठ्या दिलाने पुढे येत आहे. असेच अनेक गोरक्षनाथ कहाने भविष्यात मतदानाच्या माध्यमातून उत्कर्षा रूपवतेंचा विजय निश्चितच खेचून आणतील आणि त्यांना दिल्लीत पाठवतील. त्यावेळी खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीचा भारतीय संविधानाचा खरा विजय ठरेल.
उमेदवाराला केंद्रात पाठवण्याची उर्मी मनाशी बाळगून मदतीचा हात पुढे करून सुरूवात करणारे लाखो जन सोबत आहेत. तर मतदाराचा कस हाच माझा फोकस असून हा माझा एकट्याचा विजय
नसणार तर तो लोकशाहीचा, संविधानाचा आणि येथील आम जनतेचा विजय असणार आहे.
