कनोलीत थोरात विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरापिंपरणे / लोकवेध live न्यूजसंगमनेर तालुक्यातील कनोली येथे बुधवार दिनांक १ मे २०२४ रोजी मा. श्री. भाऊसाहेब संतुती थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनोली या विद्यालयात १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सिताराम वर्पे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला .तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी वर्पे, संचालक नामदेव वर्पे विद्यालयाचे प्राचार्य श्री. वर्पे के. एम. सर,प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक संजय वर्पे सर सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थिती कामगार दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. खरात एस.डी. सर यांनी केले.
