पेटिट ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी करियर गायडन्सचे आयोजन

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

दहावी- बारावीची परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्सुकता असते ती बोर्ड परीक्षेच्या निकालाची. दहावी- बारावी हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचे वर्ष आहे. हेच लक्षात घेऊन शहरातील सर डी एम पेटिट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य सी एन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स चे आयोजन करण्यात आले होते. अधीक्षक तथा पर्यवेक्षिका डॉ. सौ अस्मिता देशपांडे यांच्या हस्ते या करिअर गायडन्स चे उद्घाटन करण्यात आले. प्रा. अमोल टेमक यांनी विद्यार्थ्यांनी दहावीनंतर कोणती शाखा निवडावी. ११वी /१२वी या शैक्षणिक वर्षातील नीट व सीईटी परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. प्रा. स्वप्निल शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी आयआयटीची तयारी कशी करावी, प्रा. भाऊसाहेब मांढरे यांनी १२ वी नंतर विज्ञान शाखेतील करिअरच्या संधी, प्रा. सुनिता शिंदे यांनी १२ वी नंतर कला शाखेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करिअरच्या संधी, प्रा. परेश सांगवीकर यांनी १२ वी नंतर वाणिज्य शाखेतील विविध संधी या विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. रूपाली देशमुख यांनी इंग्रजी भाषेचे स्पर्धा परीक्षेतील महत्त्व तर प्रा. दशरथ गभाले यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांचे स्पर्धा परीक्षेतील महत्त्व व करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना पटवून दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दशरथ गभाले यांनी केले. प्रा. सुनिता शिंदे यांनी सूत्रसंचालन करून इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. सुशीला चिमणकर, प्रा. सिमिका मिश्रा, प्रा. उषा जाधव, श्री संतोष धुळे, मनीषा खाटेकर आदीं सह विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!