कनोली विद्यालयात बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
 संगमनेर तालुक्यातील कनोली येथील मा. श्री. भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवार दिनांक ६ मे २०२४ रोजी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून  कनोली विद्यालयातील माजी विद्यार्थी श्री. शिवप्रसाद वर्पे यांच्या मार्गदर्शना खाली या शिबिराचे नियोजन  करण्यात आले. सोमवारी सकाळी नऊ वाजता शिबिराचे उद्घाटन करण्यात आले  उद्घाटनप्रसंगी  स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा. सिताराम पाटील वर्पे, पोलीस पाटील नानासाहेब वर्पे, ग्रामपंचायत सदस्य बंडोपंत वर्पे, संचालक नामदेव वर्पे , संचालक केशव रावजी वर्पे, दशरथ गंगाधर वर्पे ,ज्ञानेश्वर (माऊली) वर्पे,पाराजी जगताप , जेष्ठ नागरिक रमेश पारखे , विद्यालयाचे प्राचार्य के.एम.वर्पे सर सुभाष वर्पे सर ,मराठी विभागाचे प्रमुख खरात सर ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित. होते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले .तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.खरात सर यांनी केले तर आभार वर्पे सुभाष सर यांनी मांडले सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!