दादा लवकर बरे व्हा ! तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे – उत्कर्षताई रुपवते
संभाजीनगर / लोकवेध live न्यूज
गरजवंत मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक लढा उभारणारे संघर्षयोद्धे मनोज जरांगे-पाटील हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल आहेत.
काल(28 एप्रिल 2024) त्यांची औरंगाबाद येथे शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि आशिर्वाद घेतले. यावेळी जरांगे पाटलांना साईबाबांची मूर्ती भेट दिली आणि लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या
यावेळी रुपवते म्हणाल्या कीमराठा अरक्षणाला पाठींबा देण्यासाठी मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात आंदोलनकर्त्या तरुणांना भेटले होते. त्यावेळी युवावर्गात आणि एकूणच समाजामध्ये जरांगे पाटील दादांबद्दल असलेल्या अफाट श्रद्धेची भावना मी जवळून अनुभवली आहे.
