सत्ताधाऱ्यांकडे दृष्टीकोनच नाही ; मतदार संघातील सुवर्ण त्रिकोणाचा विशालकोन करण्याऐवजी राज्यकर्त्यांनी मतदारांचा दृष्टिकोनच कापला ;- नचिकेत खरात

संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे

लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधीत्व करतात. मतदार संघाचा विजय व सामान्य जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी ते असतात. मतदारसंघातील मूलभूत गरजेची पूर्तता करणे हे त्यांचेच कर्तव्य आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे पाच वर्ष तर सदाशिवराव लोखंडे यांनी दहा वर्ष सत्ता भोगूनही मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास केलाच नाही. मतदार राजा मत देऊ शकतो ! परंतु, मत व्यक्त करू शकत नाही हेच दुर्दैव आहे. गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी अनेक आमदार , खासदार झाले. परंतु, मतदार संघाचा खरा विकास कोसो दूर आहे. याचा जाब उमेदवारांना न विचारता मतदारांनी स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे. हा बदल करण्यासाठी मतदार राजाने नवीन आश्वासक चेहऱ्याला संधी द्यावी अशी आर्ततेची विनवणी करीत सर्वांनीच मनावर घेतले तर बदल शक्य आहे असा आशावाद नचिकेत खरात यांनी व्यक्त केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा अपक्ष
उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर नचिकेत खरात हे संगमनेर येथील एका पत्रकार परिषदेत बोलत होते. शिर्डी लोकसभेची उमेदवारी अर्ज भरण्याची मुद्दत संपली असून तीन तगड्या उमेदवारासह एकूण 31 जणांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये 22 कर्ज वैध ठरले आहेत. शिर्डी मतदार संघाची लढत ही तिरंगी होणार असल्याचे बोलले जात असले तरी अपक्षाच्या उमेदवारीने ही रंगत आणखीनच रंगत भरणार असून कोणाची काय गत होईल हे येणारा काळच ठरवेल. खरात म्हणाले की, लढत ही प्रतिस्पर्धका बरोबर केली जाते. ती दुरंगी, तिरंगी, चौरंगी असण्यापेक्षा अतरंगी असावी, अतरंगीतूनच सर्व सामान्य मतदार राजाचे स्वप्न पूर्ण करता येईल.

*पुढचा काळ फार कठीण येणार असल्याने परिवर्तनाची गरज आहे*
अहल्यानगर जिल्ह्यातील चळवळ ही सहकारावर अवलंबून आहे. येथील भौगोलिक संपदा चांगली आहे. अहल्यानगर पुणे नाशिक हा सुवर्ण त्रिकोण असून संगमनेर मध्यावर आहे. तर शिर्डी केवळ नावारूपाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले या भागात काहीसा विकास झाला. आपल्याकडे कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. येथील व्यवसायाला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करता आली पाहिजे व आधुनिकीकरणाची जोड देत चालना देता आली पाहिजे परंतु कृती कमी पडते हे सर्व असंतोषजनक आहे पुढचा काळ फार कठीण येणार असल्याने परिवर्तनाची गरज आहे. आपला मतदारसंघ सहा विधान सभामध्ये नकारात्मकतेला वाव देत आहे. मार्केटिंगची कमतरता आहे. आपण या कार्यातून सकारात्मक विचार पुढे नेणार असल्याचे खरात यांनी सांगितले.सोशल सेक्टर मध्ये त्यांनी नऊ ते दहा राज्यात काम केले आहे. आपल्याकडे सुजलाम सुफलाम असूनही सकारात्मक काही सापडत नाही, किंबहुना तसा बदलही बघायला मिळत नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे पक्षा पक्षात वैचारिक दुफळी माजलेली आहे. व्यंग, चारित्र, भाषेबद्दल टीका टीपन्नी करतांना उमेदवार दिसून येतात. खरे तर हे चर्चेचे विषयच नाहीत . सकारात्मक बदल होण्यासाठी शेती, रोजगार, व्यवसाय, महागाई, तरुणांना कामे ,कृषी आदि क्षेत्रातील बदलावर‍ चर्चा होणे अपेक्षित असल्याचे ते म्ह

एका बाजूला पुणे दुसऱ्या बाजूला नगर तर तिसऱ्या बाजूला सिन्नर नाशिक अद्योगिक वसाहती आहे मतदार संघात एम आय डी सी नाही त्यामुळे सुशिक्षित तरूणाचे हात
बेरोजगारीचे आहेत त्यामुळे या मतदार संघात नवउद्योजक तयार करण्याचे आपले स्वप्न आह. अकोले निसर्गरम्य आहे पर्यटन क्षेत्राला वाव असूनही कृती शून्य चांगले पर्यटन क्षेत्र असून त्याची मार्केटिंग करण्यात कमी पडतो आहे.रंधा फॉल, रतनगड, सांसद व्हैली, हरिश्चंद्रगड भंडारदरा आदि पर्यटन क्षेत्र आहे. संगमनेर जसा सहकारात कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे कृषीवर आधारित कृषी प्रोड्यूसर कंपन्या सुरू करून शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळवून देता येईल. राहाता तालुक्यातील जगातील तीर्थस्थल आहे मात्र त्याचा म्हणावा असा विकास झाला . शिर्डी आंतराष्ट्रीय विमान तळावर नाईट लँडिंग नाही त्यामुळे नाईट लंडिंग सुरू करण्याचा प्रयत्न करून अद्योगिक वसाहत मंजूर करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. येथे भंडारदरा व निळवंडे धरणाची कामे पूर्ण झाली. परंतु पाटाला पाणी किती येते‌ ? किती दिवस राहते ? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तसेच पोट चाऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे असेही ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांकडे दृष्टीकोन नाही. मतदार संघातील सुवर्ण त्रिकोणाचा विशालकोन करण्याऐवजी राज्यकर्त्यांनी मतदारांचा दृष्टिकोनच कापला असल्याचे ते म्हणाले.
आता पर्यंत मातंग समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व कमीच मिळालेले आहे. कार्यकर्त्याचा नेता होणे गरजेचे आहे. मनुस्मृती पुन्हा येत आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. डीजे वाजून जयंती पुण्यतिथी साजरी होत नसते त्यास वैचारिक बैठकीची गरज असल्याचेही ते म्हणाले
विशेष करून दिशाहीन झालेल्या या युवकांना त्यांच्या भविष्यासाठी जयंती पुण्यतिथीतून प्रबोधन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
*कोण आहेत नचिकेत रघुनाथ खरात ?*
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून खरात कार्यरत आहेत. त्यांना राज्य, राष्ट्रीय पातळीवर विविध संस्थांच्या माध्यमातून उच्च पदावर काम करण्याचा अनुभव आहे. ते बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यू शिक्षित आहेत.‌
*खरात यांनी केलेली कामे*
⭕ एचआयव्ही बाधित
मुलांसाठी प्रबोधनाचे काम.
⭕ अखिल भारतीय नाट्य परिषद मधून नाट्य, एकांकिका स्पर्धेत भाग.
⭕विविध विषयांवर पथनाट्याचे लेखन व सादरीकरण.
⭕अकोले, संगमनेर, राहाता, आदि तालुक्यातील थोर मान्यवरांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त उद्बोधन.
⭕बहुजन बहुउद्देशीय शिक्षण ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना विनामूल्य निवासी शिबीरे घेतली.
⭕युवा महोत्सवा बरोबरच कचऱ्याचे व्यवस्थापन.
⭕आदिवासी बांधवांसाठी आधार, रेशन, रोजगार हमी सुरक्षा, अन्नसुरक्षा ,वन हक्क आदी विषयावर काम केले.‌
⭕ अंध बांधवांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न.
⭕भारतातील उत्तराखंड, आसाम, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र , ओडिसा, केरळ, कर्नाटक या राज्यात ग्रामीण स्तरावर विकासाची कामे केली ,
⭕ सौर प्रकल्पाच्या माध्यमातून सात हजार लोकांना फायदा तर 16000 कुटुंबांना सौर दिव्याचे मोफत वाटप,
⭕कोरोना काळात राशन कार्ड चे मोफत वाटप, प्रतिबंधात्मक लस, ज्येष्ठांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ आदि कामे केली.
*देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी मतदान करावेच*
नचिकेत खरात यांनी शिर्डी लोकसभेचा उमेदवारी अर्ज सादर केला असून आरोग्य, रोजगार, शिक्षण, शेती आणि पर्यटन या पंचसूत्रावर नागरिकांच्या समस्या सोडवणार असल्याचे ते म्हणाले. त्यामध्ये सामाजिक, आरोग्यदायी, आणि रोजगाराभिमुख अशा महत्त्वाच्या मुद्दावर आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान करणे हे अधिकारच नव्हे तर कर्तव्य आहे. सर्व नागरिकांना मतदान करण्यासाठी आपण प्रोत्साहित करणार असल्याचे सांगत देशाची प्रगती साधायची असेल तर सर्वांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!