आता नाही येणार कोणाला आमची सर, प्रतिस्पर्ध्याच्या घरात वाजणार प्रेशर कुकर : जनमानसात कविता तुफान व्हायरल
प्रेशर कुकरने वाढवले प्रतिस्पर्ध्यांचे प्रेशर; घेतलाय चांगलाच धसका
संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे
कोणी करतो उभा डमी, तर कोणी देतो हमखास हमी. अचानक कोणाला आलेली असते संधी नामी, अपक्ष माघार घेणार कधी याची वाट शोधत बसतो आम्ही. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक जण उमेदवारांच्या कार्याबदल कौतुकाची थापच देतात ती कधी कविता, बैनरबाजी, नाट्यछटा, अथवा गाणी, म्हणी इत्यादी माध्यमातून अनेक प्रकार सादर करतात. किंबहुना आपापली वेगळीच शक्कल लढवून विजयश्री खेचून आणण्यासाठी खटाटोप करतात. असाच एक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदार संघांमध्ये कवितेच्या माध्यमातून एक नामांकित महिला उमेदवार उत्कर्षा रूपवते त्यांच्या “प्रेशर कुकर” या निशाणीवर केलेली कविता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून ती सातत्याने पुढे पुढे येत आहे. विशेष म्हणजे या कवितेवर अनेकांच्या प्रतिक्रियाही सकारात्मक उमटत असून चांगला प्रतिसाद असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते ह्याच एकमेवाव्दितीय असा नवा चेहरा तरुणासह मतदारासमोर आला आहे. एक सुशिक्षित, सुसंस्कृत महिला म्हणून यांच्याकडे संपूर्ण मतदारसंघच नव्हे तर महाराष्ट्र बघत आहे. शिर्डी मतदार संघात होणा-या
या लढतीत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व खासदार सदाशिवराव लोखंडे हे प्रतिस्पर्धी आहेत. तर त्यांना जोरदार फाईट देण्यासाठी मतदार संघात एकमेव महिला म्हणून आणि आपल्या हक्काची राखीव असलेली जागा भावी खासदार म्हणून मतदार संघच झाला जागा असे वास्तव या कवितेतून
मांडले असल्याचे वाचकांनी सांगितले. वाचक आणि मतदारांनी या कवितेवर आणखीन भरभरून प्रतिक्रियाही द्याव्यात असे आवाहन करण्यात आले.
