महिला उमेदवाराची आर्त हाक ; अकल्पित मागणीने मतदार संघाचे वेधले लक्ष; चक्क महिला उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवारानांच मागितली मते,
संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे
एक लहान बहीण या नात्याने तसेच महिलांंविषयी आदर म्हणून आजी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी (स्वत:चे) अर्थात त्यांचीच मते मला द्यावीत. माझ्यासाठी ही मते खूपच महत्त्वपूर्ण असून तिच लाख मोलाचे आशीर्वाद ठरतील अशी आगळी वेगळी मागणीच उत्कर्षा रूपवते यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातील प्रतिस्पर्धी उमेदवारासह अपक्षांनाही केली आहे. या हटके मागणीमुळे मतदार संघात या चर्चेनेच चांगली रंगत वाढवलेली दिसून येत आहे. खरे पाहता अशी अकल्पित मागणी आतापर्यंत कोणीच केली नसल्याने वंचितच्या उमेदवाराने केलेल्या या अनोख्या मागणीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या घटनेकडे वेधले आहे. निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार काय नि कसे फंडे वापरेल ? काय काय शक्कल लढवेल ? हे सांगणे तसे दुरापास्तच! कारण, आजपर्यंत आपण सर्व जण पाहत आलो की, उमेदवार निवडणुकीच्या दरम्यान मतदारांच्या घरी जावून विनवणी करीत मते मागतांना दिसतात. परंतु शिर्डी मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते नामक एका महिला उमेदवाराने मत मागणीची एक अजब, अकल्पित अशी मागणी चक्क प्रतिस्पर्धी उमेदवारांच केल्याने प्रत्यक्षदर्शी मतदार संघात या चर्चेकडे सकारात्मक भूमिकेतून बघितल्या जात आहे. उत्कर्षा रूपवते यांंना आणखी विचारले असता त्या म्हणाल्या की, मी मतदार राजाच्या घरोघरी दारोदारी जात आहे, जाणार आहे. प्रत्यक्ष भेटी गाठी घेत आहे, घेणार आहे. सर्व पक्षांच्या लोकांना पदाधिकारी यांना भेटणार आहे. या धामधुमीत माझ्याकडून कोणी विसरू नये या हेतूने मी उमेदवारांनाच विनम्रपणे साकडे घातले आहे. विशेष म्हणजे हे दोघेही अनुभवी उमेदवार असून माझे मानाचे मोठे भाऊ आहेत. भावांनी मतदार संघ अनुभवला आहे आता एक संधी आपल्या बहिणीला द्यावी असे मला मनापासून वाटते. कारण दोन्ही भावांचे आशीर्वाद पाठिशी असेल तर मला कोण हरवेल ? अशा सवालातून त्यांनी एक प्रकारे उत्तर शोधले आहे. त्या म्हणाल्या मला यामध्ये नवल असे काही वाटत नाही.” कारण भावाजवळ बहिणीने भावना व्यक्त करायला काय हरकत आहे. इच्छेतून मार्ग निघतात. वाकचौरे आणि लोखंडे हे माझे मोठे भाऊ आहेत. मी लहान बहीण असून त्यांंची मते हाच आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहील, एवढेच नव्हे तर माझ्या विजयात या मतांचा वाटा हा लाखमोलाचा आणि अधिक मोलाचा ठरेल असेही रूपवते म्हणाल्या. कारण ही आर्त हाक आहे. आर्त म्हणजे इच्छा. अशी मते मागणीची आगळी वेगळी इच्छा बहुदा महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पहिल्यांदाच कोणी तरी व्यक्त केली असेल. त्या म्हणाल्या की,मतदार संघातील सर्वच पक्षातील आजी माजी आमदार खासदार पदाधिकारी यांना भेटून सहकार्य करा म्हणून आपण साद घालणार आहे. शिर्डी मतदार संघ हा माझा मोठा परिवार आहे. सर्व जिवाभावाची माणसे आहेत. येथील युवापीढी , महिला, विद्यार्थी, वंचित घटक
ज्येष्ठ नागरिक, सुशिक्षित बेरोजगार या सर्वांना सोबत घेऊन मतदार संघाला सुजलाम् सुफलाम् करणार आहे. आपल्या सर्वांची साथ आहेच ती कायम सोबत राहणार आहे. मतदान हेच श्रेष्ठ दान आहे. आपला तो अधिकार आहे. निष्कलंक, सुशिक्षित, अनुभवी आरशासारखा स्वच्छ चेहरा आज आपल्या सर्वां समोर उभा आहे. मतदार राजा आणि उमेदवाराचे हे दान एका महिला भगिनीला वरदान ठरेल. येणारा काळ व उमेदवारांची महिलाभगिनी विषयी असलेली खरी मानसिकता काय आहे हे प्रतिस्पर्ध्यांच्या टिप्पणी वरून लक्षात येईल. तसे पहावयास गेल्यास श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव, संगमनेर, राहाता, अकोले, राहुरीचा काही भाग अशा सहा तालुक्यातील जनाधार व जनमानसाचा इच्छित कौल वंचितच्या उमेदवार रूपवते यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करेल असे स्पष्ट दिसून येत आहे. अपक्षांनी स्वयंप्रेरणेने आपली शक्ती पणाला लावून मला सहकार्य करावे असेही त्या म्हणाल्या. या मतदार संघात एकमेव महिला म्हणून मी उभी आहे. सर्व मतदारांनी सहकार्य करावे आणि करतीलही असा आत्मविश्वास उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला. खरं तर आजी खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हे प्रबळ आणि दावेदार वाटत असले तरी त्यांनी या मतदार संघातील एकमेव शिक्षित अनुभवी सक्षम नेतृत्व असलेली महिला उमेदवार म्हणून मला मदत करावी, एवढेच नव्हे तर अपक्षांनी सुध्दा मला मदत करून राखीव उमेदवाराचा मान राखावा, तो आदरपूर्वक पदरात टाकावा. अशी भावनिक साद उत्कर्षा रूपवते यांनी घातलेली भावनिक साद व हटके मागणीला काय प्रतिसाद मिळेल हा काळ ठरवणार असून यावर प्रतिस्पर्धी उमेदवार आणि अपक्ष उमेदवारही नेमकी काय भूमिका घेतील ? अथवा काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे संयुक्तिक ठरेल.
आपली हक्काची खासदार
*उत्कर्षा रूपवते*
38- शिर्डी लोकसभा मतदार संघ
