आंतरराष्ट्रीय सायक्लिस्ट रत्नाकर शेजवळ हे बौध्द पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शांती सद्भावना व मैत्रीचा संदेश देत थायलंड व वियेतनाम देशांच्या यात्रेवर

नाशिक / लोकवेध live न्यूज 

नाशिक जिल्ह्यातील रेल्वे डाक सेवेचे आंतरराष्ट्रीय सायक्लिस्ट रत्नाकर शेजवळ हे बौध्द पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शांती सद्भावना व मैत्रीचा संदेश देत थायलंड व वियेतनाम देशांच्या यात्रेवर या आधी रत्नाकर शेजवळ यांनी अहमदनर ते नौखाली(बांग्लादेश) सद्भावना सायकल रैली यशस्वी पणे पुर्ण केली आहे.तसेच पंढरपूर ते घुमान (पंजाब)संत नामदेव यांच्या जयंती दिनी प्रेम व शांती चा संदेश देत सायकल रैलीत सहभाग घेतला होता.तसेच डाॕ.आबा पाटील राॕयल राॕयडर द्वारे आयोजीत मनाली ते लेह या आझादी का अमृत महोत्सव सायकल मोहीमेत तसेच मराठी शौर्य दिना निमित्त आयोजीत पानिपत ते नाशिक सायकल साहस मोहीमेत देखील सक्रिय सहभाग घेतला होता.रत्नाकर शेजवळ हे गेल्या वीस वर्षा पासुन शांती व सद्भावनेचा संदेश देत आसुन त्यांना या वर्षीचा नूतन गुळगुळे फाऊंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.भारतात आनेक ठिकाणी सायकल वर भेट देवून लोकांमध्ये मैत्री ,करूणा याची जनजागृती करत आहेत .रत्नाकर शेजवळ हे कर्णबधीर खेळाडू असुन विविध क्रिडा संघटनानीं त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे .तसेच ते विपश्यना केंद्रात धम्मसेवा देखील देतात.भुटान,नेपाळ,श्रीलंका,बांग्लादेश,म्यानमार ,थायंलड ,वियेतनाम या देशाचा शांती सद्भावना दौरा आटोपताच ते आफ्रिकेतील देशात जात आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!