जोर्वे जोडणाऱ्या पिंपरणे प्रवरेच्या पुलावरून पाण्यात उडी घेत तरुणाची आत्महत्या
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे जोडणाऱ्या जोर्वे प्रवरेच्या पुलावर जोर्वे हद्दीत एका बत्तीस वर्षीय युवकाने पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक 23 रोजी दुपारी अडीच वाजता घडली
सविस्तर माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथील नितीन भागवत थिटमे व त्याची पत्नी धनश्री थिटमे व अडीच वर्षाचा त्यांचा मुलगा आपल्या मोटर सायकल वरून डिग्रस येथील बुवाजी बाबा देवस्थानचे दर्शन साठी गेले होते दर्शन घेऊन येत असताना त्यांनी जोर्वे येथील पुलावर त्यांनी गाडी थांबवली आणि कोणताही विचार न करता त्यांनी नदीत उडी घेतली पत्नी धनश्रीने आरडा ओरड केली त्या ठिकाणी लोक जमा होई पर्यंत नितीन थिटमे यांचा जीव जाऊन ते पाण्याच्या तळाशी गेले होते यावेळी बाळासाहेब गायकवाड यांनी जोर्वे चे पोलीस पाटील बाळासाहेब दिघे यांना ही खबर दिली त्यानंतर बाळासाहेब दिघे यांनी संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनचे संपर्क साधून त्यांनी मृत व्यक्तीची माहिती सांगितली यावेळी पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ व पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्यांच्या सांगण्यावरून भाऊसाहेब पिंपळे बंटी थोरात नवनाथ बलसाने दत्तू कवडे गणेश मोरे या तरुणांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात बुडी घेऊन मृतदेह बाहेर काढला सदर मृत्यू देह उत्तरिय तपासणीसाठी संगमनेर ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी या ठिकाणी पाठवण्यात आला
यावेळी डॉक्टर राजेंद्र कोल्हे, शुभम काळे, निलेश चत्तर सचिन दिघे आदीसह जोर्वे व पिंपरणे येथील तरुणांनी या मदत केली
