पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या नेत्याच्या विरोधात समाज माध्यमामध्ये आक्षेपार्ह मजकूर आणि पोस्ट टाकणाऱ्या विरोधात कारवाई करा- संगमनेर महायुती

संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात समाज माध्यमांमध्ये आक्षेपार्ह मजकरू आणि पोस्ट टाकणाऱ्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी महायुतीच्या भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) यांनी शहर पोलीस ठाण्यात निवेदन

दिले.

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच यापुर्वी अनेकदा समाज माध्यमांमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जाणीवपुर्वक बदनामीकारक मजकूर आणि पोस्ट टाकल्या जात आहेत.

या पोस्टमुळे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र महाविकास आघाडीकडून केले जात आहे. या आक्षेपार्ह पोस्टमुळे महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाकडून दंगल घडविण्याचा करण्यात आलेला आरोपही खूप गंभीर आणि पक्षाची बदनामी करणारा

आहे.

महायुतीच्या नेत्यांच्या विरोधातील पोस्ट आणि

मजकूरांमुळे भावना दुखावल्या जात असून याला वेळीच पायबंद घातला न गेल्यास महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानाही आंदोलनात्मक भूमिका घेवून या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा देऊन दिलेल्या निवेदनाद्वारे देऊन आमच्या भावनांचा विचार करून आशा वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या विरोधात आपण कठोर कारवाई करावी अशी मागणी महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले आहे. तसेच अन्यथा यापुढे होणाऱ्या आंदोलनाची जबाबदारी प्रशासनावर राहील. असा इशारा देखील देण्यात आला आहे.

निवेदन देते वेळी भाजपच्या वतीने शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, विधानसभा प्रमुख अमोल खताळ पाटील, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, जावेदभाई जहागीरदार, दादाभाऊ गुंजाळ, राहुल भोईर, ज्ञानेश्वर कर्पे, श्रिराज डेरे, संदीप देशमुख, श्रीनाथ थोरात, सुमित काशीद, रोहिदास साबळे, दीपक भगत, शैलेश फटांगरे, राम जाजू, राजेंद्र सांगळे, हरीश वलवे, अतुल कासट, वाल्मीक शिंदे, राजाराम लांडगे,सीताराम मोहरिकर, माधव थोरात, सोमनाथ नेहे, शंकर वाळे, गोपीनाथ रूपवते, वरद बागुल,सोपानराव हासे, महेश मांडेकर, संदेश देशमुख, भाऊ जाखडी, वरद बागुल, जग्गू शिंदे, कैलास गोडसे, भाऊसाहेब खताळ,अरुण थिटमे, बाळासाहेब गोसावी, केशव दवंगे, स्वरूप राऊत, नितीन पानसरे, शामसुंदर जोशी, विजय बेल्हेकर, ऋषिकेश कांडेकर, संतोष हांडे, साहेबराव वलवे,रेवणनाथ लहामगे, संजय कवडे,बाळासाहेब गोसावी,किशोर नावंदर, शुभम लहामगे, मंगेश थोरात,सुरेश निळे,संतोष क्षीरसागर, संजय कांडेकर,

तसेच राष्ट्रवादी कडून जिल्हा अध्यक्ष कपिल पवार, तालुका अध्यक्ष आबासाहेब थोरात, मनीष माळवे.

शिवसेना कडून दिनेश फटांगरे, रणजीत जाधव सह महायुती पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!