शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी विकृत पोस्ट व्हायरल..
भाजपच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यासह इतरांवर कायदेशीर कारवाई करण्याची महाविकास आघाडी कार्यकर्त्यांची मागणी..
संगमनेर / लोकवेध live न्यूज
लोकसभा निवडणुकीच वारं शिर्डी लोकसभा मतदारसंघात थंडावलं असलं तरी समाज माध्यमात मात्र अद्यापही त्याचे पडसाद उमटत आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रात छेडछाड करून ते छायाचित्र समाज माध्यमात आक्षेपार्ह मेसेजच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले. त्यामुळे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून मंगळवारी भाजपाचे जिल्हा पदाधिकारी असलेल्या दीपक भगत तसेच माजी नगरसेवक अजित माणियार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
संगमनेर पोलिस शहरात समाजमाध्यमातून वातावरण दूषितकरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधातकोणती भूमिका घेतात याकडे लक्षलागले आहे. दरम्यान प्राथमिकउपायोजना करताना पोलिसांनीसंबंधित व्हाट्सअप ग्रुपच्याअॅडमिनला नोटीस बजावली आहे.
राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमधील सोशल वॉरमधून दोन धर्मीयांच्या तसेच दोन पक्षांच्या
भावना दुखावल्या जात असल्याने या माध्यमातून सामाजिक शांततेला
गालबोट लावू शकते. याची जाणीव
असताना देखील समाज माध्यमातून अशा प्रकारचे संदेश सातत्याने टाकले जातात.
विशेष म्हणजे शहरातील बहुतांशी
व्हाट्सअप ग्रुपवर शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असताना देखील अशा प्रकारचे मेसेज व्हायरल केले जातात. शासकीय अधिकारी
देखील अशा मेसेजकडे बऱ्याचदा कानडोळा करताना दिसतात.
संगमनेरात गेल्या काही दिवसातीलजातीय प्रकार बघता या संबंधानेसमाज माध्यमात देखील विविधप्रकारच्या चर्चा सुरू होत्या. यातूनचदोन धर्मीयात तेढ निर्माण करण्याचाप्रयत्न असल्याचा देखील आरोपसातत्याने होत होता. मात्र वेळीचप्रशासनाने या गोष्टी काबूतआणल्याने अनर्थ टळला.
महाविकास आघाडीच्यावतीने प्रमुख
कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीत
भाजप पदाधिकारी असलेले दीपक भगत यांच्यासह काही लोक सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांबद्दल आक्षेपार्ह मेसेज,
छायाचित्रे व्हाट्सअप ग्रुप,फेसबुकसह अन्य समाज माध्यमात टाकत असतात. त्यातून भावना दुखावल्या जातात. यातून सामाजिक
स्वास्थ बिघडण्याची शक्यता असल्याने अशा लोकांवर, समाजकंटकांवर प्रशासनाने कारवाई
करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक शैलेश कलंत्री, नूरमोहम्मद शेख, सोमेश्वर दिवटे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष निखिल पापडेजा, मोहसीन शेख,हैदरअली सय्यद, कमलेश उनवणे,
माजी शहर प्रमुख अमर कतारी, शरद कवडे, सुभाष दिघे, अजीज मोमीन,अमोल डुकरे, अजित याकूब मोमीन,
वैभव अभंग, दीपक साळुंखे, असिफ तांबोळी, त्रिलोक कतारी, अनुप म्हाळस होते.आदी या वेळी उपस्थित
हे दंगली भडकविण्याचे कारस्थान….नगर जिल्ह्यात दोन्ही ठिकाणीमहाविकास आघाडीचे उमेदवारनिवडून येण्याच्या चर्चा असल्यानेदोन धर्मात तेढ निर्माण करणारेमनोविकृत माणसे संगमनेरमध्येदंगली घडविण्याचे कट कारस्थानकरत आहेत. समाजमाध्यमावरयापूर्वदिखील दीपक भगत वमणियार यांनी उद्धव ठाकरे, शरदपवार, राहुल गांधी यांच्याविषयी असेव आक्षेपार्ह मजकूर लिहूनफेसबुक आणि व्हॉट्सअपवरप्रसारित केला होते. तसेच “सौ शहरीएक संगमनेरी” या व्हॉट्सअप ग्रुपवरत्याने प्रसारित केलेला फोटो हाआक्षेपार्ह असून आमच्या भावनादुखावल्या आहेत. त्याचप्रमाणेताजिया, मिरवणूक वगैरे शब्दवापरुन हिंदू-मुस्लिम वाद निर्माणकरायचा याचा उद्देश असल्याचासंशय आम्हाला येत आहे. तरी अश्यामनोविकृत लोकांचा आपण तातडीनेबंदोबस्त करावा. जेणेकरुनशहरातील वातावरण दूषित होणारनाही. अन्यथा संगमनेरमध्ये जातीयदंगल, समाजात तेढ निर्माण होऊनतणाव घडू शकतो अशा चुकीच्यागोष्टीला पायबंद बसावा यासाठी यासमाजकंटकांवर गुन्हा दाखल करावा.अमर कतारी, माजी शहरप्रमुख ( शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे)
