बुध्दाने लोककल्यांणाचा मार्ग सांगितला आहे -सुकुमार कांबळे

आश्वी  / लोकवेध live न्यूज 

बहुजन समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे शिक्षित व साधन संपन्न वर्ग निर्माण झाला आहे. आज साधन संपन्न वर्गाची पीछेहाट सुरु असून समाज खोट्या जातीय अहंकाराने अधिक समस्याग्रस्त होत आहे.यावर उपाय म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे बोट पकडून बुद्ध धम्माच्या मार्गानेच लोककल्याण होऊ शकते असे प्रतिपादन महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत सुकुमार कांबळे यांनी केले.
कांबळे म्हणाले बुद्ध धम्म हा आपला वारसा असून या वारश्याबरोबर स्वतःला जोडणे गरजेचे आहे. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पणतू विलास साठे यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले की,जग बदलण्याची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यावर टाकली असून शेवटच्या श्वास असेपर्यंत प्राणांची बाजी लावून ते कार्य आपण केले पाहिजे.बुद्ध धम्म हा उत्कर्षाचा मार्ग असल्याचे साठे यांनी सांगितले.मी हे कार्य शेवटच्या श्वास असेपर्यंत करणार आहे. बुद्ध जयंती निमित्त
अनिल मुन्तोडे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त जयंती महोत्सव समितीने सदर प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्तविक भाषणात विकास भडकवाड यांनी समितीच्या शृंखलाबध्द कार्याचा आढावा घेऊन कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला.
श्रेया, तन्वी, पूर्वा, कावेरी, साक्षी, काजल व समीक्षा यांनी उदघाटन प्रसंगी अनोख्या प्रकारे लेझीम नृत्यातून महामानवांना मानवंदना दिली.
डॉ. पदमेश्वरी भडकवाड यांनी सांगितले की बाबासाहेब आंबेडकरांचे योगदानातून आजचा संपन्न वर्ग तयार झाला असून त्याची समाजासाठी योगदान देण्याची गरज आहे.संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष
डॉ. निलेश मुन्तोडे यांनी सहकारी कार्यकर्ते यांचे अभिनंदन करताना यापुढे प्रबोधन कार्य अधिक जोमाने करणार असल्याचे सांगितले.या समितीला लोकांनी लोकाश्रय मिळाला असून मी लोकांचे ऋण व्यक्त केले.
यावेळी डॉ. विशाल मुन्तोडे यांची वर्ग एक च्या वैद्यकीय अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशील मुन्तोडे , सुरज मुन्तोडे ,प्रणय मुन्तोडे, सिद्धार्थ मुन्तोडे , आकाश मुन्तोडे ,राजेंद्र मुन्तोडे सर, आशुतोष कदम सर, विकास भडकवाड, सागर खरात, दिलीप बर्डे, अखिल मुन्तोडे, बबन मुन्तोडे, सुधाकर मुन्तोडे,एकनाथ मुन्तोडे, प्राचार्य जगदीश मुन्तोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
आशुतोष कदम व विकास भडकवाड यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!