आ. जितेंद्र आव्हाड या विकृताच्या प्रतिमेला भाजपा, महायुतीच्या वतीने संगमनेर मध्ये जोडो मारो आंदोलन करून निषेध
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड या विकृताच्या आज भारतीय जनता पार्टी, महायुतीच्या वतीने संगमनेर बस स्थानक परिसरात आज जितुद्दिनच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला.
जितेंद्र आव्हाड यांना नेहमी स्टंटबाजी करण्याची सवय लागली असून प्रत्येक वेळेस ते अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करताना महाराष्ट्राने पाहिले आहे.
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून प्रतिमेला अंडे मारून निषेध करताना कार्यकर्ते यांच्या भावना अतिशय तीव्र स्वरूपाच्या होत्या.
आव्हाड विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
*आज त्यांनी जे पोस्टर फाडले त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो बाजूला करणे अपेक्षित होते, त्यांचा मान राखणे गरजेचे होते. मात्र, आव्हाड यांना त्याचे भान राहिले नाही का मुद्दाम त्यांनी स्टंटबाजी केली. आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा, अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संगमनेर येथे आलेले पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे साहेब यांच्याकडे महायुतीच्या वतीने करण्यात आली.*
त्याप्रसंगी भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताळ पाटील, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, हरिष चकोर, गोकुळ दिघे, सीताराम मोहरिकर, राहुल भोईर, बुवाजी खेमनर, रोहिदास साबळे, दीपक भगत, हरिष वलवे, शरद गोर्डे, सोमनाथ नेहे, रोहिदास गुंजाळ, घनश्याम भारस्कर, नवनाथ कानकाटे,वरद बागुल, विकास जाधव, महेश मांडेकर, संजय वाकचौरे, सतीश गोपाळे,शामसुंदर जोशी, प्रशांत कोल्हे,रणजित गायकवाड, ओंकार कातोरे,कमलेश डेरे, गणेश सोनवणे, गणेश पावसे, अरुण थिटमे, विकास गुळवे, सुयोग गुंजाळ, संजय कवडे,ऋतिक निळे,घनशाम भोसले, गोपीचंद गुंजाळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष कपिल पवार, अक्षय भालेराव, शिवसेना वतीने दिनेश फटांगरे, मनसेच्या वतीने तुषार ठाकूर सह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आव्हाड यांच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला.
