संगमनेरला सुंदर व स्वच्छ बनवणाऱ्या ताई = नामदेव कहांडळ 

नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा 

राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, मदर तेरेसा अशा थोर महिलांनी देशाला समुद्ध वारसा मिळवून दिला आहे. यातुनच स्त्री सबलिकरणाची चळवळ राज्यात प्रभाविपणे राबविणाऱ्या जयहिंद महिला मंचच्या अध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांचे नाव महाराष्ट्रात अग्रक्रमावर असून संगमनेर शहर व तालुका हिरवे करण्याचा त्यांनी वसा घेतला असून विविध वृक्षांमुळे आता हे शहर झाडांचे शहर म्हणून ओळखले जावू लागले आहे. संगमनेरला स्वच्छ व सुंदर बनवणाऱ्या लोकप्रिय नगराध्यक्षा म्हणजे सौ.दुर्गाताई तांबे होय.

थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दुरदुष्टी व समुद्ध नेतृत्वात संतसाऊलीत विधीमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात व सौ.दुर्गाताई तांबे यांना समाजकारणाचे बाळकडू मिळाले. आमदार बाळासाहेब थोरात हे अतिशय समर्थपणे राज्यात प्रभावी काम करत आहेत तर सौ.दुर्गाताई तांबे उत्तर महाराष्ट्रात महिला चळवळीच्या नेत्या म्हणून काम करित आहे. नाशिक पद्वीधर मतदार संघाचे मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंदच्या लोकचळवळ राज्यात निरोगी व निकोप समाज निर्मीतीचे काम करत आहे. यातील महिला सबलीकरनासाठी कार्यरत असलेल्या जय हिंद महिला मंचची धुरा ताईंनी समर्थपणे सांभाळली आहे.

 

हरित सृष्टीसाठी दंडकारण्य अभियान चळवळ

आज पर्यावरणाचा ऱ्हास मोठया प्रमाणात होत असून सर्वत्र सिमेंटची जंगले उभी राहत आहे. या परिस्थितीत संगमनेर तालुक्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियान चळवळीचा धडक कार्यक्रम दंडकारण्याच्या प्रकल्प प्रमुख सौ.दुर्गाताई तांबे यांनी राबविला. पावसाचा लहरीपणा,वाढते तापमान,कडक उन्हाळा ग्लोबल वार्मिंग या सर्वातून ढासळत चाललेले पर्यावरण संतुलन यावर पर्याय म्हणजे सातत्याने वृक्षारोपन करुन जंगल वाढविणे. हाच उद्देश डोळयासमोर ठेवून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (दादा ) यांनी दंडकारण्य अभियानाला २००६ साली जन्म दिला. हेच दंडकारण्य अभियान २०२४ मध्ये राबविले जात आहे.

 

ताईंच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाद्वारे महिला सबलीकरण

१९९८ मध्ये जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून सुरु झालेल्या या चळवळीत आजमितीस तालुक्यात ४००० महिला बचत गट कार्यरत आहेत. ताईंच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी मागील २५ वर्षांपासून आरोग्य शिबीरे, महिला मेळावे, व्यायाम मार्गदर्शन शिबीरे,क्रिडा,सांस्कृतिक स्पर्धा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या पिशव्या, खाद्य पदार्थ, काजू प्रक्रिया उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली. महिला पतसंस्था,दुग्ध व्यवसायाची उभारणी झाली. बचत गटांमार्फत विविध रोपवाटिका,गरीब व गरजू महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, आरोग्य विमा अशा अनेक सुविधा दिल्या जातात. या सर्व कामांसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरु केला आहे.

संगमनेर हे झाडांचे शहर

संगमनेरच्या नगराध्यक्षा म्हणून काम करतांना संगमनेर स्वच्छ,सुंदर,हरित करतांना हे शहर ग्रीन सिटी गार्डन सिटी करण्याचा ताइर्ंनी कायम प्रयत्न केला आहे. नागरिकांना आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देतानाच शहर विकासासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे संगमनेर शहर हे देशातील प्रगतशील व स्वच्छ शहर म्हणून ओळखले जात आहे. स्वच्छतेबरोबरच शहरात २५ बगिचे,ओपन जीम, नागरिकांच्या आरोग्यासाठी फिरायला ट्रॅक उभारण्यात आले. पर्यावरणासाठी हवा स्वच्छ रहायला हवी याकडे ताइर्ंचे कायम लक्ष आहे. भविष्यात संगमनेर शहर थंड हवेचे ठिकाण म्हणून पुढे यावे हाच ताइर्ंचा उद्देश आहे. यासाठी शहरात खूप मोठया संख्येने वृक्ष लागवड व संवर्धन केले जात असून संगमनेर हे झाडांचे शहर म्हणून ओळखले जात आहे.

विकासातून वैभवाकडे वाटचाल

आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निळवंडे पाईप लाईनच्या स्वच्छ व मुबलक पाण्याबरोबर मागील काळात सतत झालेल्या विकास कामांमुळे संगमनेर शहर हे राज्यात प्रगतशील म्हणून ओळखले जात आहे. नव्याने झालेले हायटेक बसस्थानक हे जनू एअरपोर्ट निर्माण झाले आहे. तर अद्यावत इमारती, बायपास,भूमिगत गटारे,क्रिडा संकूल,विविध रस्ते,विविध गार्डने, ट्रॅकिंग रस्ते, वाचनालये,इंजि.कॉलेज ते बसस्थानक रस्त्याचे चौपदरीकरण याच बरोबर शहरात येणाऱ्या चार ही बाजूंच्या रस्त्यांचे चौपदरीकरण व सुशोभिकरण यामुळे शहराची वैभवाकडे वाटचाल सुरु आहे. आता नव्याने बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा लवकरच होणार आहे.

ताई

शहरातील जणतेच्या आग्रहातुन १५० वर्ष असलेल्या नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. यामुळे सह्याद्री ते सातपुडा असे कार्य करतांना त्यांच्या कार्याचा गैारव राज्यपातळीवर झाला. बुलढाणा येथील स्व.विलासराव देशमुख प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार,फिलीवस फौंडेशनचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार,तेजस्वीनी पुरस्कार, वीरभारती पुरस्कार,स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान पुणे पुरस्कार,डॉ.बाबा आमटे,यशवंत वेणू आदिं सह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार ताइर्ंना मिळाले आहे.

दररोज सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत जनसंपर्कात राहतांना लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न ताई करत असतात. शहरातील प्रत्येक घरातील नागरिकांचे नावानीशी संपर्क त्या घराच्या परिसरात असलेले वृक्षांची माहिती हे सर्वांना चकित करणारे आहे. ताईंनी समाजकारणात काम करतांना वाचनासह साहित्याची गोडी ही जपली आहे. त्यांनी ओव्यांचा काव्यसंग्रह,गाणी दंडकारण्याची,शिदोरी गितांची, आदि पुस्तकांचे संपादनही केलेले आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात ताई कवयत्री म्हणून ओळखल्या जातात. प्रत्येक काम नव्याने हातळ्याची पद्धत, स्मरणशक्ती यामुळे ताईंचे काम हे लोकप्रिय ठरत आहे.

अशा हरितसृष्टीसह स्वच्छ व सुंदर संगमनेर शहराचा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या सौ.दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसानिमीत्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने हार्दीक शुभेच्छा !!

नामदेव कहांडळ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!