नवनाथ वावरे गाव गाड्यातला कार्यकर्ता, निर्भिड निरपेक्ष पत्रकार, सामाजिक बांधिलकी जोपासणारा युवा कार्यकर्ता !

 

आपल्या दैनंदिन जीवनात रोजीरोटीसाठी मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे व त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, सामाजिक बांधिलकी जपत गरजुना गरजेनुसार विविध माध्यमातून मदत करणे, परिसरातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व विविध प्रकारच्या उपक्रमांस आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसिद्धी देणारे निर्भिड निरपेक्ष पत्रकार, माणुसकी धर्म अंगिकारलेला नवनाथ वावरे यांच्या बाबत आज थोडासा लेखनप्रपंच करुन शुभेच्छा देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

जेमतेम शिक्षण घेतल्यानंतर मालपाणी उद्योग समुहात रोजंदारी पद्धतीने संगमनेर तालुक्यात एक छोटीशी नौकरी मिळविली, नोकरी करत असताना तात्कालिन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते स्व. काॕ. सहाने मास्तर यांच्या संपर्कात आले, कम्युनिस्ट पक्ष व त्यांचे कार्यकर्ते नेहमी शेतकरी व कामगार यांच्या विविध मागण्या, विविध समस्या यावर विविध आंदोलने मोर्चे काढले जायची त्यातुन संबंधित प्राधिकरणाला मागण्या, समस्या मान्य करण्यासाठी योग्य ते पर्याय सुचवुन, योग्य ते निर्णय पटवुन देत शेतकरी व कामगारांच्या पदरात नेहमीच समाधान मिळवून देत असत. हे सर्व नवनाथ वावरे सहाने मास्तर यांच्या सोबत राहुन पाहत असे, त्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत असे, परंतु कालांतराने कम्युनिस्ट पक्षाचे नेते सहाने मास्तर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांनंतर तंबाखु कामगार युनियन चे अध्यक्ष काॅ. माधवराव नेहे, संघटनेचे सरचिटणीस ॲड.काॅ. ज्ञानदेव सहाणे यांच्या सोबत कामगार चळवळीचे काम करु लागले. मालपाणी उद्योग समुहात कार्यरत राहुन नवनाथ वावरे यांनी आपल्या फावल्या वेळात पत्रकारिता करु लागले, कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेशी अनेक दिवस संलग्न राहिले परंतु डावा विचार कधीच त्यांनी अंगिकारला नाही, फक्त शेतकरी व कामगार यांच्या न्याय हक्कासाठी लढवय्या नेते सहाणे मास्तर, काॅ. माधवराव नेहे, ॲड ज्ञानदेव सहाणे यांच्या संपर्कात राहून काम करत आहे. मालपाणी उद्योग समुह सेवकांची सहकारी पतसंस्थेत संचालक चे चेअरमन अशी यशस्वी वाटचाल राहीली आहे. विविध सामाजिक संघटना, पक्षसंघटनेत विविध जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडत त्या पदाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.

“थकनार नाही, वाकणार नाही,उतनार नाही,मातनार नाही,घेतला वसा टाकणार नाही” या लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारांचा प्रभाव अंगात तग धरून आहे, आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रस्तावित राजकारणी लोकांची जहागीरदारीला न जुमानता आपले ध्येय धोरणे उराशी बाळगून संघर्षाचा लढा देण्याचे बळ मिळवले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या केडर कॕम्प मध्ये तयार झालेले चळवळीतील कार्यकर्ते आहेत.
डिग्रस गावांसह पंचक्रोशीत नवनाथ चे एक सामाजिक वलय निर्माण झाले, सामाजिक कार्य करताना अनेकांच्या नेतृत्व हितसंबंधांना बाधा येणार सर्वसामान्य युवक पुढे जातोय अशी सल मनात ठेवुन अनेकांनी मुळाशी घाव घालून कायमस्वरूपी खच्चीकरण करण्याचे कृत्य केले, चांगले कार्य करुनही दुष्मनीच वाट्याला आली पंरतु थांबेल तो चळवळीतील कार्यकर्ता कसला? कम्युनिस्ट पक्ष डावा विचार ते भाजप पक्ष उजवा विचार दोन्ही विचारधारेतला “राजहंस” ‘दुध का दुध आणि पाणी का पाणी’ करत आपले कार्य अविरतपणे चालुच ठेवले, उलट जेवढा विरोध झाला,जेवढी संकटे आली तेवढ्याच वेगाने गरुडझेप घेण्याच्या संधीच सोनं करत एक वेगळीच छाप निर्माण केली, साधी राहणीमान अन् उच्च विचारसरणी हे तत्व अंगीकारुन कुटुंब, शेती, नोकरी, समाजकारण, पत्रकारिता या सर्वांचा यशस्वी प्रवास अविरतपणे सुरूच आहे.

नवनाथ भाऊ तुमच्या या जन्मदिनानिमित्त मी माझ्या लेखणीला सावरु शकत नाही कितीही लिहावे ते थोडेच, ‘मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची… तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची…पर्वा बी कुनाची’ असं म्हणत, सध्याच्या कठीण प्रसंगाशी जिद्दीनं लढा देणाऱ्या संघर्षात वाढु पाहणारा गावगाड्यातला कार्यकर्ता, सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात राजहंसाप्रमाणे कार्य करावे व गरुडझेप घ्यावी

नवनाथ भाऊ हे अनेकांच्या सुख दुःख ‌समयी नेहमी धावून येत असतात अतिशय संवेदनशील असलेल्या दोस्तीच्या पर्वातील नवा अध्याय रचणारा तळमळीचा कार्यकर्ता,ज्याच्या जीवनात पैश्याला नेहमी दुय्यम स्थान आहे.
पैसा मिळविला की माणूस सुखी होतो अशी आज प्रत्येकाची विचारसरणी झालेली दिसून येते त्यासाठी जो तो त्वरित पैसा कसा कमवावा याचाच विचार करताना दिसतो मग संपत्तीच्या मागे पळणारा माणूस माणुस्कीला विसरतो पण पैसा हे फक्त साधन आहे हे तो विसरतो,विकत घेतलेल्या ‌सर्वच वस्तू मानसिक सुख देतील असे नाही पैश्यापेक्षा मानवता महत्वाची असे अशी माणूसपणाची भिंत जपणारा नवनाथ भाऊ म्हणजे जवळपास उपभोगशुन्य स्वामीच…
वाढदिवस एका युवा नेतृत्वाचा..
वाढदिवस एका संयमी मनाचा..
वाढदिवस एका उज्वल भविष्याचा..
वाढदिवस समतामुलक अभियानाचा..
वाढदिवस एका मनाच्या श्रीमंतीचा…
वाढदिवस एका कुशल संघटकाचा..
वाढदिवस एका सुसंस्कृत विचाराचा..
वाढदिवस एका विशाल नम्रतेचा..
वाढदिवस आपल्या माणसाचा..
वाढदिवस आमच्या भाऊचा..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा साहेब 
Wish You Happy Birthday..

 

शब्दांकन

सुभाष भालेराव

 संपादक – लोकवेध live न्यूज 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!