रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल आडगाव मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

राहता / लोकवेध live न्यूज 

 

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल आडगाव याठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . विद्यालयाचे ध्वजारोहण ध्वजारोहण स्थानिक स्कूल कमिटी सदस्य गोरक्षनाथ माळोदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रम प्रसंगी माजी मुख्याध्यापक मुरलीधर हिंडे,जे. टी. शिंदे, काशिनाथ शिंदे,मल्हारी मते,अनिल पवार,भिकाजी पाटील शिंदे, माणिकभाऊ शिंदे,तुकाराम यशवंत लभडे उमेश शिंदे,नितीन माळोदे, गोरक्षनाथ लभडे,अशोक माळोदे, प्रकाश रसाळ, नारायण लभडे, ताराचंद तपकिरे,राष्ट्रीय कबड्डी खेळाडू चि.आकाश शिंदे,शितलताई माळोदे, विद्याताई शिंदे उपस्थित होते .विद्यालयाच्या स्काऊट गाईड पथकाने ध्वजाला मानवंदना दिली या कार्यक्रम प्रसंगी आडगावातून प्रभातफेरी स्वातंत्रयाच्या घोषणा देत ढोलताशाच्या तालावर आडगाव परिसर अनेक सामाजिक संस्थांच्या ध्वजारोहणाला उपस्थित राहत परत विद्यालयात आली . विदयालयाच्या प्रांगणात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कला प्रकाराला सर्व प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली . तसेच देवश्री नागपूरे ह्या विद्यार्थीनीने भारताचा इतिहास सर्वांसमोर आपल्या भाषणातून मांडला.सर्वंच कार्यक्रमांनी प्रेक्षकांची वाहवा मिळविली.इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मिले सुर हमारा तुम्हारा’ या गीताचे सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक केले . विद्यालयात रांगोळी स्पर्धा , कथाकथन स्पर्धा , सुंदर हस्ताकर सर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .तसेच पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी’ समाजसेविका विद्याताई शिंदे यांनी २० रोपे विद्यालयास भेट दिली व त्यांच्याच हस्ते वृक्षारोपन करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी गोरक्षनाथ माळोदे,मल्हारी मते भिकाजी पा. शिंदे ,माणिकराव शिंदे , उमेश शिंदे ,गणेश शिंदे,प्रभाकर माळोदे ,नितीन माळोदे ,शितलताई माळोदे हे मान्यवर उपस्थित होते . मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून गरीब नवाज बेकरी यांच्या कडून नानकटाई ,तसेच आडगाव वि.कार्यकारी सोसायटी यांच्याकडून गोळ्या देण्यात आल्या.विदयालयाच्या नियोजनानुसार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फुलमाळी संतोष व पवार अर्चना यांनी केले होते . विद्यालयात सादर झालेल्या कार्यक्रमाबाबत भिकाजी पा.शिंदे यांनी कौतुक करत विद्यार्थ्यांना व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.विद्यालयाचे पर्यवेक्षक कैलास बागले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!