डॉ. श्रीनिवास पोतदार यांना पीएच.डी. प्रदान
अकोले / लोकवेध live न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ पदवीधर शिक्षक तथा केंद्र मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास विजय पोतदार यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत इतिहास विषयातील सर्वोच्च डॉक्टरेट पीएच. डी. ( विद्यावाचस्पती ) पदवी प्रदान करण्यात आली आहे. पोतदार यांनी विद्यापीठाला ब्रिटिशकालीन नाशिक जिल्ह्याचे प्रशासन – एक अभ्यास ( इ. स. १८६९ ते १९४७ ) या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. या संशोधनासाठी अहमदनगर न्यु आर्ट्स काॅलेज व इतिहास संशोधन केंद्राच्या डाॅ. मीना साळे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. याशिवाय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, डॉ. किसन अंबाडे, डॉ. नारायण भोसले, डॉ. आर. पी. भामरे, डाॅ. व्ही. पी. बिरारी, डॉ. लहू काकडे, डॉ. अशोक बिडगर, डॉ.अनिल करवर, डॉ. दिलीप बागुल, डॉ. आसाराम देसाई, डॉ. संदिप नन्नवरे, डॉ. बाळू शिंगोटे, प्रा. मोहन पवार, प्रा. नवनाथ येलमामे, प्रा. होळकर, प्रा. सप्रे, प्रा.विगे यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या यशाबद्दल पोतदार यांचे अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ, पोषण आहार अधिक्षक अरविंद कुमावत, राहाता तालुका गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, डाएट संगमनेर अधिव्याख्याता वृंद, देवठाण बीट शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, टाकळी केंद्रप्रमुख रोहिणी खतोडे, पंचायत समिती अकोले शिक्षण विभाग तसेच टाकळी ग्रामपंचायत सरपंच दत्तु गरुड व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब फोडसे, डॉ.जनार्दन मोरे, नाना गायकवाड व सर्व सदस्य, टाकळी, शेंडी व भंडारदरा शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन व कौतुक केले. श्रीनिवास पोतदार यांना डाॅक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
