राष्ट्रीय समाज पक्ष संगमनेर विधानसभा लढवणार
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर येथे उत्तर अहिल्या नगर ची मिशन २०२४ विधानसभा आढावा बैठक व्यापारी असोशियन हॉल येथे संपन्न झाली या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.काशिनाथ (नाना) शेवते साहेब हे बैठकीचे अध्यक्ष होते त्याच प्रमाणे मा.ज्ञानेश्वर माऊली सलगर मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य मा.डॉ. प्रल्हाद पाटिल सचीव महाराष्ट राज्य मा. सय्यद बाबा शेख कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य मा. शरदराव बाचकर अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र मा. अजित पाटील पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा. सौ अनिताताई बागुल उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष मा. रभाजी खेमनर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. शशिकांत मतकर उत्तर महाराष्ट् उपाध्यक्ष मा.डॉ.सुनिल चिंधे सचिव उत्तर महाराष्ट्र मा. दतात्रय कचरे सदस्य उत्तर महाराष्ट्र मा. आशुतोष जाधव युवक आघाडी अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र मा. नानासाहेब जुंधारे जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर मा. नानासाहेब काटकर शिर्डी लोकसभा अध्यक्ष मा. श्रीमती सुवर्णांताई जऱ्हाड मॅडम महिला जिल्हा अध्यक्षा अहिल्यानगर मा. नंदुभाऊ खेमनर युवक आघाडी अध्यक्ष अहिल्या नगर हे सर्व प्रमुख पद अधिकारी उपस्थित होते या शिवाय संगमनेर अकोले राहुरी राहता कोपरगाव श्रीरामपुर नेवासा तालुक्यातील तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष विधान सभा अध्यक्ष व प्रत्येक तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते दि.२९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा २१ वा वर्धापण दिन अकोले जिल्हा येथे मोठ्या उत्साहात व थाटामाटा साजरा करण्यात आला या कार्यक्रमात पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते साहेब यांनी महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदार संघ राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार याची घोषणा केली या गोष्टीला आदरणीय मा. महादेव जी जानकर साहेबांनी सहमती दर्शवली व कार्यकर्तेना कामाला लागण्याचे आदेश दिले महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आढावा बैठकी चालू आहे याचा अनुषंगाने काल संगमनेर मध्ये आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शेवते नाना व मुख्य महा सचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर यांनी अहिल्यानगर येथे मा. जानकर साहेबांच्या उपस्थितीत बुथ कार्यकर्तेचा मेळावा होणार आहे अशी माहिती दिली व जिल्हा अध्यक्षनां व प्रत्येक तालुका अध्यक्षानां आपल्या तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे असे आदेश देऊन इच्छुक उमेदवारा ची चाचपणी गाठी भेटी घेऊन त्यांचाशी चर्चा करावी असे आदेश देण्यात आले या नुसार संगमनेर येथिल विधानसभा मतदार संघ२१७राष्ट्रीय समाज पक्ष लढणार आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष सोपान तांबडे यांनी तालुक्याचा आढावा देतानां वरिष्ठांना माहिती दिली सुत्र संचालन नानासाहेब जुंधारे यांनी केले व आभार प्रदर्शन रभाजी खेमनर यांनी केल यावेळेस संगमनेर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महिला तालुका अध्यक्षा तयेबा जावेद सय्यद महिला शहर अध्यक्षा सौ. भोई मॅडम विधान सभा अध्यक्ष भाऊ साहेब वारे संगमनेर तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र खेमनर शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब घोडे रासप चे जेष्ठ नेते बाबुराव पवार काका युवक अध्यक्ष पंकज खेमनर ता. संपर्क प्रमुख एकनाथ बिडगर राजु घोडे बाजीराव दातीर असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
