संगमनेर शहरपोलीस स्टेशन हद्दीतील अवैध मटका व जुगार बंद न केल्यास शिवसेना करणार आंदोलन– अमर कतारी
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे

संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमुख यांना अमर कतारी यांचे निवेदन तक्रार अर्ज याबाबत 11/09/2024रोजी दिलेल्या तक्रार अर्जामध्ये खालील मागणी करण्यात आलेली आहे
महोदय
मी वरील तक्रार अर्जदार आपणास कारणे विनंती अर्ज करतो कि संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अनेक अवैध धंदे सुरू आहे शहरातील 50 पेक्षा जास्त ठिकाणी मटका जुगाराच्या पेढ्या सुरू आहे या जुगारांमुळे अनेक वेळा दंगली घडलेल्या आहेत गणेशोत्सव नंतर दसरा दिवाळी व संगमनेर मध्ये निवडणुकीचे वातावरण आहेयाचा गोष्टीचा फायदा घेत संगमनेर मध्ये दंगल घडवून संगमनेर चे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न अवैध व्यावसायिक करत असतात, अनेक युवा पिढी या अवैध व्यवसायामुळे देशोधडीला लागलेली आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात अवैध मटका व्यवसाय ऑनलाइन जुगार गेम चालत आहे या ठिकाणी अनेक वेळा वाद उद्भवले आहेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व मुस्लिम समाजाची प्रार्थना स्थळ, मशीद शेजारी असताना देखील अवैध मटका व्यवसाय सह ऑनलाइन जुगार व्यवसाय चालतो याचा व्यवसायामुळे अनेक वेळा हिंदू मुस्लिम वाद देखील झालेले आहेत तरीही आपण संगमनेर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचा सहनुभूती पूर्वक विचार करून संगमनेर ची शांतता व सुव्यवस्था आबाधित ठेवावी ही अपेक्षा, तसेच संगमनेर मध्ये सुरू असलेला ऑनलाइन गेम, बिंगो, लोटो सह मटका व्यवसाय त्वरित बंद करावा अन्यथा गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर 20/09/2024रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने कोणत्याही क्षणी उपोषण आंदोलन रास्ता रोको आंदोलन मोर्चा व इतर प्रकारचे आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या परिणामाची जबाबदारी आपली राहील याची दक्षता घ्यावी संगमनेर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी व शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आलेली आहे
