म्हणून उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेलं….राज ठाकरेंचा निशाणा..
लोकवेध live न्यूज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. ठाण्यामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. या भाषणातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. हिंदुत्वाला मानता म्हणजे नेमकं काय असतं तुमचं? भोंगा प्रकरणानंतर अयोध्याला जाणार होतो, पण विरोध करणारे हिंदुत्ववाले होते, ज्यांनी हे सगळं केलं, त्याचं पुढे काय झालं? असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार बृजभूषण चरणसिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांचा दाखला दिला.
बृजभूषण चरणसिंग यांच्यावर निशाणा साधताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही प्रहार केला. मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठीच्या आंदोलनावेळी मनसेच्या 17 हजार कार्यकर्त्यांवर केस टाकल्या, नंतर मुख्यमंत्रीपद गेलं. आपल्या वाटेला जायचं नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
