मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा थाटात संपन्न.
सोलापूर / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद
सोलापुर येथील होम मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास आलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना उपस्थित असलेल्या लाडकी बहीण कडून राख्या बांधण्यात आल्या व त्यांचे स्वागत करण्यात आले.
मान्यवर स्टेजवर येताच मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली . मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आलेल्या लाडक्या बहिणीना मंत्र्याकडून मार्गदर्शन केले .
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार जय सिध्देश्वर स्वामी, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय शिंदे, शहाजी बापू पाटील, राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे पाटील, श्री. शिवाजी सावंत, महावितरण चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त शितल उगले तेली, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे, ज्योती वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
