दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली
संगमनेर पोलिसांची कामगिरी
संगमनेर- लोकवेध live न्यूज 
संगमनेर पोलिसांनी नाशिक- पुणे हायवे वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या व विनानंबरच्या वाहनात दबा धरून बसलेल्या हत्यार बंद 4 दरोडेखोरांना पकडले आहे.
तर एक दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. दरोडेखोरांच्या वाहनात व जवळ कुन्हाडी, कोयते, रॉड, नॉयलॉन दोरी असे दरोड्याचे साहित्य मिळून आले. अधिक माहिती अशी की, आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास संगमनेर ते पुणे जाणारे हायवे रोडवर सूर्या देशी बार अलीकडे काही अंतरावर वरील आरोपी महेंद्र लक्ष्मण मधे, वय 25 वर्षे, रा. अभंगवस्ती, नाराणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे 2) अविनाश चंद्रकांत जाधव, वय 26 वर्ष, रा. शिरोल (बोरी), डावखर मळा, ता. जुन्नर, जि. पुणे. 3) प्रविण चंद्रकांत जाधव, वय 24 वर्षे, रा. शिरोली (बोरी), डावखर मळा, ता. जुन्नर, जि. पूर्ण 4) रोहन रामदास गि-हे, वय 20 वर्षे, हल्ली रा. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे, मूळ रा. शिदोड, ता. अकोले, जि. अहमदनगर असे कळविल असता त्यांना मपोसई पटेल यांनी पळून गेलेल्या पाचव्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 5) सोन्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही असे असल्याचे सांगितले आहे) सदर आरोपी दरोडा घालण्याची पुर्व तयारी करून वाहन व साहित्य साधनासह मिळून आले आहे. तसेच एक आरोपी  पोलिसांना पाहून पळून गेला, आरोपींविरूध्द शहर पोलिसात भा.द.वि. कलम 399,402 सह भारतीय  कायदा कलम 4-25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी उपविभागीय पोलीस अधीकारी, संजय सातव, शिर्डी विभाग चार्ज संगमनेर विभाग यांचे व शहर पोलीस निरीक्षक भगवान मधुरे संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांचे आदेशाने स. पो. नी. पटेल, पो.हे.कॉ आठरे, पोना दातीर, पोकों, आढाव, पोको बोडखे, होमगार्ड थोरात एम. यांनी यांनी ही कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!