नामदार राधाकृष्ण विखे पाटील व जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या संगमनेर तालुक्यात  जाहीर सभा
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल खताळ पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी नऊ वाजता भारतीय जनता पार्टी चे स्टार प्रचारक राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या आहेत.
 
 

शुक्रवारी सकाळी ठिक ९:०० वाजता सावरगाव तळ , ११:०० वाजता पेमगीरी, दुपारी ४:०० वाजता वडगाव लांडगा या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे, तरी संगमनेर तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

 
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मा. खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी तळेगाव, साकुर, धांदरफळ, अंभोरे या गटात चार सभा विक्रमी लोकसंख्याच्यां उपस्थितीत गाजवल्या होत्या, त्यांनंतर प्रचार शुभारंभ सभा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली होती.
 
यानंतर प्रथमच या सभांचे आयोजन करण्यात आले आहे, जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. दोन्ही ही स्टार प्रचारक काय बोलणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
 
 तरी संगमनेर तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनी, महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!