संगमनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा , नगरपालिका शाळा ,शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांचे सेफ्टी आणि सेक्युरिटी चे प्रशिक्षण पूर्ण

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

*समग्र शिक्षा अभियान, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद* यांच्या वतीने संगमनेर तालुक्यातील आश्रमशाळा व प्राथमिक शाळेंच्या 352 मुख्याध्यापक शिक्षकांना संगमनेर तालुक्यातील केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी व विस्ताराधिकारी यांच्या उपस्थित सेफ्टी आणि सेक्युरिटीचे प्रशिक्षण स्किल ट्री कन्सल्टन्सी च्या वतीने आयोजित केले होते या प्रशिक्षणासाठी संगमनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री गुंड साहेब, विस्ताराधिकारी व सर्व प्राथमिक शाळांचे केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक

उपस्थिती होते या प्रशिक्षणासाठी अहिल्यानगरचे डिस्ट्रिक्ट हेड श्री लोकेश भट सर आणि ब्लॉक कॉर्डिनेट श्रीमती स्वाती शिंदे मॅडम उपस्थिती होत्या संगमनेर तालुक्यासाठी प्रशिक्षनाचे मास्टर ट्रेनर श्री योगेश वाळे सर , श्री प्रविण ढोकरे सर , श्रीमती सारिका खताळ मॅडम व श्रीमती चत्त्तर मॅडम अकोले तालुक्यातील महेश शेटे सर यांनी प्रशिक्षणात सर्व शिक्षकाना मार्गदर्शन केले स्किल ट्री कॅन्सल्टनशी संस्थेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचे सत्कार करण्यात आले .या प्रशिक्षणा दरम्यान गटशिक्षणाधिकारी सरनी सर्वाना मार्गदर्शन केले व प्रशिक्षणानंतर तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुखांना पेन ड्राइव्ह चे वाटप करण्यात आले व सर्व प्रशिक्षणार्थींना शाळेत लावण्यासाठी एका भित्तिचित्रे किटचे वाटप करण्यात आले
तसेच संगमनेर महाविद्यालयाने साईबाबा हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल संगमनेर कॉलेज च्या प्राचार्य चे आभार मानण्यात आले
प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण ढोकरे सर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!