कर्मवीरांनी शाहू-फुले-आंबेडकराचा वारसा जपला- आनंद शितोळे

 निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज /अशोक गोसावी 

 

कर्मवीर भाऊरांव पाटलांच्या विचारातून रयत शिक्षण संस्था उभी राहिली.यासाठी कर्मवीर अण्णांनी खूप मोठा त्याग करुन रयतेसाठी अफाट कष्ट घेतले. कर्मवीरांचा आदर्श घेत विद्यार्थ्यांनी वटवृक्षाची फांदी होऊन आपल्या नवीन विचारांची नवनिर्मिती केली पाहिजे.कारण जेव्हा वटवृक्षांची फांदी जेव्हा जमिनीवर टेकते तेव्हा नवीन वटवृक्षाची निर्मिती होते.तसेच इंग्रजी शिक्षण ही काळाची गरज आहे. असे सांगताना शितोळे म्हणाले की, ज्यांनी-ज्यांनी लष्कराच्या भाकरी भाजल्या म्हणूनच आपण आज याठिकाणी सुखात आहोत. या महाराष्ट्रात समाजसुधारकांनी कुठलाच स्वार्थ मनात न ठेवता मनापासून सेवा केली. म्हणूनच आज आपल्याला बघायला मिळते की; शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा कर्मवीरांनी जपला असे प्रतिपादन लेखक व सामाजिक कार्यकर्ते आनंद शितोळे यांनी सात्रळ येथील१३७ व्या कर्मवीर जयंतीच्या कार्यक्रमात केले.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी सात्रळच्या रयत शिक्षण संस्थेचा इतिहास आपल्या मनोगतातून स्पष्ट करताना अरुण कडू म्हणाले की ;कर्मवीर भाऊराव पाटील व थोर स्वातंत्र सेनानी कॉ‌.पी.बी.कडू.पाटील तथा आप्पा यांच्या संकल्पनेतून झाली त्यामुळेच परिसरातील खेडेगावांची शिक्षणाची सोय झाली मंदिरापासून सुरू झालेला शाखेचा प्रवास बघितला तर आज सात्रळची शाळा भौतिक सुविधा संपन्न आहे. असे विचार अरुण कडूंनी आपल्या भाषणातून मांडले.
याप्रसंगी रयत शैक्षणिक संकुलात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलन आनंद शितोळे, कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष शांतीलाल गांधी तसेच अरुण कडू पाटील यांच्या समवेत आदि मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत स्कूल कमिटीचे सदस्य पंकज कडू पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप व प्रेरणा मिळावी म्हणून मान्यवरांच्या शुभहस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान शांतीलाल गांधीनीं भूषविले. तसेच अॅड विजयराव कडू पाटील, पंकज कडू, सागर डुक्रे,मधुकर अनाप, विठ्ठलदास असावा, बाबा नवगजे, आण्णासाहेब साबळे, सुहास वैद्य, कीशोरजी भांड, सुनिल सात्रळकर, बापूसाहेब बेंद्रे, दिनकर कडू पाटील, अण्णासाहेब सिनारे, गुरुमुखदास हिरानंदानी, चंद्रकांत डुक्रे, भाऊसाहेब पेटकर,सुखदेव राहिंज, भगवान गागरे,आप्पासाहेब गागरे, भाऊसाहेब अंत्रे,के.डी तांबोळी, भास्कर गोसावी, दत्तात्रय वदक, प्राचार्य राजेंद्र बडे कन्या विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अनिता निबे पर्यवेक्षिका सुशिला थोरात यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गभाले आणि प्रकाश कुलथे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका अनिता निबे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रयत शैक्षणिक संकुलातील सर्व सेवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!