पंडित नेहरू विद्यालय निमगाव जाळी येथे भव्य गणित,विज्ञान व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन

 

 निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज /अशोक गोसावी

 

महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे
पंडित नेहरू विद्यालय व ज्युनि. कॉलेज निमगाव जाळी ता.संगमनेर येथे
21 डिसेंबर 2024रोजी विद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष गुलाबरावजी जोंधळे यांच्या प्रेरणेने व कार्यकारी संचालक प्रा.दीपकभाऊ जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य गणित-विज्ञान प्रदर्शन व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विज्ञान प्रदर्शनामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन 150 गणित व विज्ञान उपकरणांची निर्मिती करून त्यांचे यथायोग्य प्रदर्शन सकाळी ९:00 ते १:00 पर्यंत संपन्न झाले.
यामध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वरील प्रदर्शन व स्पर्धेसाठी सर्व शालेय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच गणित व विज्ञान प्रदर्शनाला संस्थेचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जोंधळे यांनी शुभेच्छा दिल्या.उदघाटनप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.यात मच्छिंद्र थेटे,व्हा.चेअरमन, प्रवरा बँक, मा चेअरमन,ठकाजीराव थेटे ,
श्री रंगनाथ वदक मा.चेअरमन,सुनील शेठ डेंगळे, मा. सरपंच अमोलभाऊ जोंधळे, उपसरपंच,सुरेश डेंगळे, मुख्याध्यापक कौतुक तांबे ,डॉ.मुकुंद जाधव,सोमनाथ जोंधळे, चेअरमन टी.पी. जोंधळे ,रंगनाथ वदक मामा, पत्रकार अशोक गोसावी,पत्रकार राजेंद्र थेटे राजेंद्र डेंगळे, उपसरपंच ज्ञानेश्वर डेंगळे ,दिलीप डेंगळे, भाऊसाहेब डेंगळे, बाळासाहेब तळोले,माऊली डेंगळे, वैभव वदक, रामनाथ बिडवे,शरद तांबे,गणपत तांबे,संदीप डेंगळे,थोरात साहेब,रामा सातपुते, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी,शिक्षक व ग्रामस्थांनी प्रदर्षांस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट उपकरणे तयार केल्याबद्दल आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. परीक्षक म्हणून जयपुरनिवासी,सौ माधुरी जाधव,माजी सरपंच सविता मुकुंद जाधव सौ वनिता गागरे ,सौ कमल थेटे यांनी गणित विज्ञान व रांगोळी स्पर्धेचे परीक्षण केले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब गागरे , ज्येष्ठ विज्ञान शिक्षक प्रताप जोंधळे , रमेश डेंगळे सर,जितेंद्र जोंधळे ,खेमनर सर,ढवळे,सौ प्रतिभा जोंधळे ,सौ काळबांडे मॅडम यांनी सहभागी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!