तुषार लक्ष्मण मुठे यांनी पुणे मॅरेथॉनमध्ये मिळविला प्रथम क्रमांक.
अकोले / लोकवेध live न्यूज
आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर संचालित अनुदानित आश्रम शाळा कोथळे (कॅम्प अकोले) यांचा विद्यार्थी तुषार लक्ष्मण मुठे याने प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये 200 मी,400 मी,600 मी धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेकडे वाटचाल केली, असुन पुणे (बालेवाडी) येथे झालेल्या ५ किमी धावणे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून 26,000 रू बक्षिसास पात्र झाला आहे.त्याने आश्रम शाळेचे नाव उज्वल केले आहे. तुषारच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
तुषारचा या स्पर्धेतला पहिल्या क्रमांकाचा हा विजय त्याच्या कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि क्रीडाप्रतीच्या समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्या या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्येही प्रोत्साहनाची लाट निर्माण झाली आहे.
आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी तुषारचे कौतुक करताना सांगितले की, “तुषारने आपल्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने हा विजय मिळविला आहे. त्याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”
त्याच्या या यशाबद्दल आश्रम शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक कोंडार , प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीम.घोडके, तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षक अनिल हासे , शाळेचे सर्व शिक्षक , अधीक्षक अधिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी अभिनंदन केले आहे.हासे विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त वैभव पिचड सेक्रेटरी भवारी संस्थेचे अध्यक्ष घाणे उपाध्यक्ष, सी.बी. भांगरे संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी तुषारच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले असून शाळेच्या मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.
तुषारला पुढील सर्व स्पर्धांसाठी शुभेच्छा आणि त्याच्या यशस्वी भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे. व त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
