पिंपरणे येथे मा. रणजितदादा हाफ टेनिसबॉल क्रिकेट करंडक २०२५ चे दिमाखात उद्घाटन
पिंपरणे (ता. संगमनेर) :
मा. रणजितसिंह देशमुख युवा मंच, पिंपरणे यांच्या वतीने आयोजित मा. रणजितदादा हाफ टेनिसबॉल क्रिकेट करंडक २०२५ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे. या दहा वर्षे पूर्ण करणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटनाचा मान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या उद्घाटन समारंभास माजी आमदार सुधीर तांबे, पदवीधर आमदार सत्यजित तांबे, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री थोरात शरदनाना थोरात, विक्रमसिंह खताळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. क्रीडाप्रेमी युवक, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ही स्पर्धा १५ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ७.०० ते रात्री ११.०० या वेळेत खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचे ठिकाण तलाठी कार्यालय शेजारी, पिंपरणे, ता. संगमनेर असे आहे.
स्पर्धा सिंगल टेनिस हाफपिच, क्वॉटर फायनल हाफ या स्वरूपात होणार असून प्रवेश फी ११०० रुपये ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५१,००० रुपये, द्वितीय ३१,००० रुपये, तृतीय २१,००० रुपये, चतुर्थ ११,००० रुपये तर पंचम पारितोषिक ५,००० रुपये असे आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेच्या अटी व शर्तींनुसार ९ खेळाडूंना खेळण्याची संधी, एक गाव एक संघ, आधारकार्ड आवश्यक असून पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी धनंजय देशमुख, हर्षल काळे, सुमित देशमुख, अक्षय खडांगळे, मयुर देशमुख, शुभम काळे, प्रदिप मांडे, प्रसाद मांडे, तुषार देशमुख, मयुर काळे, अमोल राहिंज, अविनाश खडांगळे, विक्रम देशमुख, यशराज देशमुख यांच्यासह समस्त ग्रामस्थ, पिंपरणे परिश्रम घेत आहेत.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 8668287458 / 8605349540 / 9552921779 / 9011758122 / 9822787201 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दहा वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या स्पर्धेमुळे पिंपरणे व परिसरातील युवकांना क्रीडाक्षेत्रात नवे व्यासपीठ मिळणार असून उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
