साईकृपा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची तालुका स्तरावर कुस्तीमध्ये दमदार चमक

नेवासा / लोकवेध live न्यूज / दत्तात्रय शिंदे

क्रीडा क्षेत्रातील अंगभूत जिद्द, कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध तयारी यांच्या जोरावर साईकृपा माध्यमिक विद्यालय, टाकळी लोणार येथील दोन विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर आपली ताकद सिद्ध केली आहे.

परिक्रमा क्रीडा संकुलात नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत इयत्ता नववीतील अरमान अन्सार खान याने १७ वर्षे वयोगटातील ४५ किलो वजनगटात, तर इयत्ता दहावीतील ओंकार मोहन कदम याने १७ वर्षे वयोगटातील ६० किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावून यशाची वेगळी शिखरे गाठली.

या उल्लेखनीय यशाबद्दल श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय पानसरे, सचिव सौ. अर्चनाताई पानसरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दिलीप पानसरे सर, सर्व शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांनी दोन्ही कुस्तीपटूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

कुस्तीच्या मातीशी असलेले विद्यार्थ्यांचे नाते आणि त्यामागील कठोर सराव यामुळे साईकृपा विद्यालयाने पुन्हा एकदा तालुका स्तरावर क्रीडा क्षेत्रात आपली भक्कम छाप उमटवली आहे. या विजयामुळे विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!