जिल्ह्यात झोळे गावचा झेंडा; झोळेश्वर विद्यालयातील मुलींचे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश”
अहिल्यानगर : लोकवेध live न्यूज
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत झोळेश्वर आदर्श ग्राम-विकास विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत विजय मिळविला. कुस्तीक्षेत्रात परंपरेने मुलांचे वर्चस्व असताना झोळ्याच्या शिलेदार मुलींनी दमदार खेळ करून स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत झोळेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी खालीलप्रमाणे यश मिळविले –
- १४ वर्षे वयोगट, ३० किलो वजन गट : कु. कोमल सुभाष गुरकुले – तृतीय क्रमांक
- १७ वर्षे वयोगट, ४९ किलो वजन गट : कु. कल्याणी विलास एरंडे – तृतीय क्रमांक
- ६१ किलो वजन गट : कु. वैष्णवी राजेंद्र वाळे – द्वितीय क्रमांक
- ६५ किलो वजन गट : कु. सुरेखा संजय खर्डे – द्वितीय क्रमांक
विद्यार्थिनींच्या या यशामुळे झोळे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या या विजयाबद्दल हनुमान शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ झोळे, ग्रामपंचायत झोळे, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, पालकवर्ग तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
कुस्तीच्या मैदानात झोकून देऊन खेळणाऱ्या या मुलींनी मेहनत, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर मिळवलेले यश नक्कीच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
