पंडित नेहरू विद्यालय निमगाव जाळी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*

 

 निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी 

 

पंडित नेहरू विद्यालय व स्व.सत्यभामाबाई राणुजी जोंधळे जुनिअर कॉलेज,निमगाव जाळी ता.संगमनेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य बी.व्ही.गागरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ डोखे , सौ वाणी , सौ जोंधळे प्रतिभा, सौ काळबांडे व विद्यालयातील विद्यार्थिनींच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक प्रताप जोंधळे,वाणी,रमेश डेंगळे,जोंधळे जितेंद्र व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यालयातील
विद्यार्थिनीं कु.डेंगळे गौरी, आहेर भूमी, भोसले आराधना,डेंगळे स्वरा, वदक अबोली, जोंधळे अबोली, डेंगळे तनवी,आहेर तन्वी, थोरात गौरी, ढगे गौरी, डेंगळे ईश्वरी, तळोले ईश्वरी, बोर्डे समीक्षा, आरगडे श्रद्धा, खरात परी,गीते समृद्धी, डेंगळे वैष्णवी, खरात साक्षी आणि अभंग पार्थ,थेटे सार्थक यांनी आपली मनोगते व्यक्त केली.या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेमनर सर यांनी केले,
उपस्थितांचे आभार विद्यालयातील विज्ञान शिक्षिका सौ. प्रतिभा जोंधळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!