घारगावच्या पुणेकर मित्र मंडळाची नवकार्यकारणी स्थापन !गाव विकासाचा ध्यास.
स्नेह संमेलन मेळावा संपन्न.
घारगाव /लोकवेध live न्यूज /नवनाथ गाडेकर
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील पुणेकर मित्र मंडळाच्या वतीने रविवार दि. ५ जानेवारी रोजी सायं.६ ते १० वाजताच्या दरम्यान स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.हे स्नेह संमेलन मराठी अस्मितेचे माहेरघर पुणे येथील मोशीतील हॉटेल ८४ ईस्ट प्राधिकरण या ठिकाणी मोठ्या थाटामाटात पार पडले.
या स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश आहेर (सर) यांची निवड करण्यात आली.त्यांनी पुणेकर मित्र मंडळाचे स्थापनेचा ईतिहास व उद्देश सर्वांपुढे मांडला.या कार्यक्रमाचे नगरसेवक संजय आहेर यांनी प्रास्ताविक करत सर्वांचे स्वागत केले.योगेश आहेर यांनी अहवाल वाचन केले.नितीन आहेर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.या वेळी माजी अध्यक्ष नरहरी आहेर, ऊर्मिला आवटे व हांडे साहेब यांनी आपले विचार मांडले.भालचंद्र मुळे साहेब यांनी वृक्ष संवर्धन व त्यांचे मानवी जीवनात असणारे महत्त्व विषद केले. दरम्यानच्या काळात पुढील पर्वासाठी संचालक मंडळाची बहुमताने निवड करण्यात आली आहे.
घारगावातील पुणेकर मित्र मंडळाच्या स्नेह मेळाव्यात नवीन कार्यकारिणी जाहीर जाहीर करण्यात आली आहे
नवीन कार्यकारिणी
अध्यक्ष पदी सुदर्शन गजानन आहेर.उपाध्यक्ष पदी रोहिणी मुळे ,खजिनदार पदी योगेश सुभाष पाटील आहेर,सचिव पदी प्रशांत मनोहर आहेर
यांची निवड करण्यात आली आहे.नव निर्वाचित कार्यकारिणीचे सर्वांनी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले.
यावेळी स्नेह संमेलनास पुणेकर मित्र मंडळाचे सर्व सभासद आपल्या सह कुटुंब सह परिवारासह उपस्थित होते. या निमित्ताने जादुगार बाबु यांचे जादूचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते.तसेच चिमुकल्या लहान मुलांचे कौतुकास्पद डान्स देखील सादर करण्यास आले.यात मागिल दोन पर्वात विविध कामे पुणेकर मित्र मंडळाने हाती घेतली आहेत.यामध्ये प्रामुख्याने आळंदी येथील धर्म शालेसाठी ५१०००/₹ देनगी व दरवर्षी मुक्ताई देवीस चोळी पातळ, आळंदी दिंडी सोहळा स्वागत व अन्नदान, चालु वर्षी मुक्ताईदेवी मंदिरात धातूंचे श्लोक पट्टी अर्पण करणे बाबत देखील निर्णय घेण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे शेवटी सर्व पुणेकर मित्र मंडळाने नवनिर्वाचित कार्यकारिणीत निवड झालेल्या सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत. सुरुची भोजनाचा आस्वाद घेत.सर्वाचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
