जिल्हा परिषद शाळा टाकळी येथे तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न
टाकळी (अकोले) लोकवेध live न्यूज

– अकोले तालुक्याच्या देवठाण बीटातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी येथे मकर संक्रांती निमित्ताने सामुदायिक तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हर्षोल्हासात संपन्न झाला. यावेळी शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक तिळगुळाचे लाडू वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुद्धा सर्व शिक्षकांना तिळगुळ वाटप करून गुरूजनांचे आशीर्वाद घेतले. “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” या सुवचनाने शाळा परिसर मंत्रमुग्ध झाला. या प्रसंगी टाकळी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार व सहकारी शिक्षक दत्तात्रय देवगिरे, संजय देशमुख व संजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटपाचे तसेच मकर संक्रांत सणाचे महत्त्व विशद केले. या सुंदर उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष बाळासाहेब फोडसे, उपाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, डॉ. जनार्दन मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, केंद्रप्रमुख श्रीमती रोहिणी खतोडे यांनी शाळेस शुभेच्छा दिल्या. याशिवाय अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी श्री.अभयकुमार वाव्हळ यांनी टाकळी शाळेच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
