रयत संकुल,सात्रळ येथे कॉ.पी.बी.कडू पाटील “समाजक्रांती पुरस्कार सोहळा ” मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक वितरण समारंभ तसेच श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय इमारत भूमिपूजन समारंभ

 निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज 


रयत संकुल,सात्रळ, ता. राहुरी, जि.अहिल्यानगर येथे रविवार दि.19 जानेवारी 2025 रोजी कॉ.पी.बी कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार वितरण सोहळा व मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक वितरण समारंभ तसेच श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय इमारत भूमिपूजन समारंभ *मा.श्री.चंद्रकांत दळवी साहेब IAS (Retd.)*
*चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा* यांचे शुभ हस्ते व मा.अ‍ॅड.भगीरथ शिंदे साहेब ,व्हा.चेअरमन, रयत शिक्षण संस्था,सातारा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. कॉ.पी.बी.कडू पाटील फाउंडेशन,सात्रळ, ता. राहुरी जि.अहिल्यानगरच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा समाजक्रांती पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी खासदार डॉ. रामशेठ ठाकूर यांना देण्यात येणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा.कैलासजी शिंदे आय.ए.एस आयुक्त,नवी मुंबई,महानगरपालिका,. महेंद्रशेठ घरत, अध्यक्ष, रायगड जिल्हा काँग्रेस ,विकासराव देशमुख आय.ए.एस,सचिव,रयत शिक्षण संस्था,सातारा प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के कुलगुरू,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ,सातारा प्रि.डॉ.शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव,उच्च शिक्षण,रयत शिक्षण संस्था,सातारा,बंडू पवार साहेब,सहसचिव माध्यमिक,रयत शिक्षण संस्था ,सातारा,आमदार आशुतोष काळे,विभागीय अध्यक्ष,रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,अहमदनगर, प्रकाशजी निकम,चेअरमन बांधकाम समिती,रयत शिक्षण संस्था,सातारा. हे उपस्थित राहणार असून विशेष आमंत्रित म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य माजी आमदार दादाभाऊ कळमकर,राहुल जगताप,अशोक काळे भगवानराव पाचपुते, विजयराव औटी, खा. निलेशजी लंके, मीनाताई जगधने ,बिपिन कोल्हे, भाई माळोदे, मा.प्राचार्य शिवाजीराव भोर ,राजेंद्र फाळके, बाळासाहेब बोठे ,बाबासाहेब बोस,संदीप वर्पे,बाळासाहेब बोठे,रवींद्र देवकर,ज्ञानदेव पांडुळे,अंबादास पिसाळ बापूसाहेब पठारे ,कारभारी आगवन,कुंडलिकराव दरेकर, आण्णासाहेब शेलार,मच्छिंद्र रोहमारे, बाळासाहेब कदम,पद्माकांत कुदळे,अशोक बाबर अभिषेक कळमकर, शौकत तांबोळी,सुभाष गांधी डॉ.सुजित गुंजाळ,अभयसिंह फाळके,मोहन काकड मनोज कवडे,अर्जुनराव पोकळे,अनिल साळुंखे अरुण चद्रे ,शिवाजी सोनार महादेव भोसले ,बाजीराव कोरडे,डॉ.राजीव,श्रीमती रितूताई एबट हे उपस्थित असतील तरी या कार्यक्रमास शिक्षण प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व कॉ. पी.बी.कडू पाटील फाउंडेशनचे,अध्यक्ष अरुण कडू पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी,नवनाथ बोडखे,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य रावसाहेब शिंदे,एकनाथजी घोगरे,रयत संकुलचे प्राचार्य राजेंद्र बडे,कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक दिलीप माळी,प्रगती पतसंस्थेचे चेअरमन ॲड.विजयराव कडू पाटील,स्कूल कमिटीचे संभाजीराव चोरमुंगे पा. यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!