जिल्हा परिषद टाकळी शाळेत ओरिगामी हस्तकला पेपर कार्यशाळा संपन्न

टाकळी अकोले – लोकवेध live न्यूज 

पंचायत समिती शिक्षण विभाग अकोले व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी यांच्या समन्वयातून टाकळी शाळेत नुकतीच ओरिगामी हस्तकला पेपर कार्यशाळा संपन्न झाली.‌ या कार्यशाळेत हस्तकला तज्ञ मार्गदर्शक श्री. विकास बारोट, अहमदाबाद (गुजरात) यांनी विद्यार्थ्यांना क्राफ्ट कलेचे विविध नमुने सादर केले. टाकाऊ पेपर, पुठ्ठे यांपासून फुलदाणी, पंखा, पुष्पगुच्छ, फुगा, कॅमेरा, शुभेच्छा कार्ड, डायरी, मुकुट इत्यादी विविध कागदी वस्तू व मुखवटे बनवण्याची प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यशाळेत सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी कृती युक्त सहभाग घेतला.‌ सहशालेय उपक्रमांतर्गत आयोजित ओरिगामी हस्तकला पेपर कार्यशाळेच्या निमित्ताने टाकळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.श्रीनिवास पोतदार तसेच उपाध्यापक श्री संजय देशमुख, संजय शिंदे व निता लेंभे यांनी विद्यार्थ्यांना कला व कार्यानुभव विषयाचे महत्त्व समजावून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!